शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मन्याड धरण निम्मेच भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:31 IST

‘मन्याड’ परिसरातील २२ गावांचे जलसंकट मोचक असलेले मन्याड धरण यावर्षी निम्मेच भरले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास ऐक आवर्तन शक्यपाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणारआठ वर्षात फक्त दोनदा मन्याड धरण भरले १०० टक्केतीन वर्षामध्ये पन्नाशी तर दोन वर्षामध्ये १२ ते १८ टक्के भरलेगेल्या वर्षी शून्याच्याही खाली

विजय पाटीलआडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ‘मन्याड’ परिसरातील २२ गावांचे जलसंकट मोचक असलेले मन्याड धरण यावर्षी निम्मेच भरले आहे. यामुळे परिसरातील गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. तसेच पाहिजे त्या प्रमाणात खरीप हंगामही घेता येणार नाही. परिसरातील शेतकरी यावर्षी चांगली आशा बाळगून होता. परंतु त्याच्या आशेवर संपूर्ण पाणी फिरल्याने खरीपावरच त्याला समाधान मानावे लागणार आहे.एका महिन्यातच धरण ५० टक्केपावसाळा जरी चार महिन्यांचा असला तरी तो कुठे कधी व किती होईल हे कुणालाही सांगता येत नाही. याचा प्रत्यय यावर्षी जवळजवळ सर्वांनाच आला. सगळीकडे पाऊसच पाऊस नदी, नाले, धरणे तुडूंब भरून वाहू लागले तर काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. याला अपवाद ठरला तो मन्याड परिसर. पावसाळा सुरू झाल्यापासून एकसारखा निसर्गाकडे आस लावून बसलेला शेतकरी पोळ्यापर्यंत परिसरावर कुठेही उपयुक्त साठा हा जवळजवळ ५० टक्क्यांच्या आसपास आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास व पाणी काटकसरीने वापरल्यास एक आवर्तन चारा पिकासाठी व पिण्यासाठी देणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परतीचा पाऊस धरण परिसरात झाल्यास धरण १०० टक्के भरल्यास दोन/तीन आवर्तन देण्यास कुठलीही अडचण राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.मन्याड धरणाची क्षमता १९०५ द.ल.घ.फु.आहे. यातील मृत साठा ४८३ द.ल.घ.फु. आहे. या धरणाचे बुडीत क्षेत्र २१७७ एकर म्हणजे ८७१ हेक्टर त्यापैकी ४०० हेक्टर क्षेत्र हे लिफ्टवर भिजते आणि ६५०० हेक्टरात खरीप व रब्बी हंगाम निघतो.कोणत्या वर्षी धरण किती टक्के भरलेसन २०१२-१३ मध्ये १२ टक्केसन २०१३-१४ मध्ये १०० टक्केसन २०१४-१५ मध्ये ४९ टक्केसन २०१५-१६ मध्ये १८ टक्केसन २०१६-१७ मध्ये १०० टक्केसन २०१७-१८ मध्ये ६३ टक्केसन २०१८-१९ मध्ये शून्य टक्केसन २०१९-२० मध्ये ५० टक्के

टॅग्स :water shortageपाणीकपातChalisgaonचाळीसगाव