शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानी खळखळला मन्याड कालवा

By admin | Updated: January 9, 2017 00:53 IST

शेतक:यात समाधान : रब्बीच्या पिकांना होणार फायदा, शेतांमध्ये आले कामांना उधाण

आडगाव, ता.चाळीसगाव : यंदा मन्याड धरण 100 टक्के भरल्याने अखेर तीन वर्षानी मन्याडचे कालवे आवर्तन सुटल्याने खळाळताना दिसत आहे.मन्याड  परिसर तीन वर्षापासून पाटाचे पाण्यापासून वंचित होता. लागोपाठ तनी वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देत 2013 नंतर  निसर्गाच्या कृपेने 2016 मध्ये ऑक्टोबर महिन्यात मन्याड धरण 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतक:यांच्या आशा  पल्लवित झाल्या. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, पशूपालक बेजार झाला होता.  निसर्गाने मात्र साथ दिल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवित झाल्या.असा वाहतो पाण्याचा प्रवाह मन्याड धरण 100 टक्के भरल्यावर रब्बी हंगामासाठी  त्याचा चांगला उपयोग होतो. खरीप पिकाने धोका दिल्यास रब्बी हंगाम तारतो हा आजपावेतोचा शेतक:यांचा अनुभव आहे. मन्याड धरणातून  पाणी सोडल्यावर त्याचे दोन भागात  विभाजन केले जाते. चारी क्र. 1 ते 6 याचा एक भाग व 6 ते 12 याचा दुसरा भाग. त्यामुळे प्रथम एका सेक्शनला पाणी सोडण्यात येते.   धरणावरील विसंबून असणा:या 22  पैकी 11 ते 12 खेडय़ांचा पहिला एक टप्पा व उर्वरित खेडय़ांचा दुसरा टप्पा.  अशा रितीने पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन केले जाते. यात सेक्शन 1 ते 6 साठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून  एस.बी. पाटील यांच्या अधिपत्याखाली काम होते तर दुस:या टप्प्यात 6 ते 12 सेक्शनसाठी सी.एन.पाटील हे कामकाज पाहतात. धरणातून पाणी सोडल्यावर नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी, ब्राrाणशेवगे, पिंप्री, शिरसगाव, तळोदा, टाकळी, आडगाव, चिंचखेडे, देवळी, डोणदिगर, उंबरखेड गावाचा एका टप्प्यात समावेश होतो. सद्य:स्थितीत चारी क्रमांक 10 व 11 पाणी सोडण्यात आले आहे.रब्बी हंगाम  हुकल्याने नाराजीधरण भरुन यावर्षी प्रथमच जानेवारीत पाणी मिळत असल्याने रब्बीचा हंगाम गहू, हरबरा, भुईमूग घेण्यापासून शेतकरी मुकला. याला कारण म्हणजे  पाटबंधारे विभागासह शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत. कारण पाटबंधारे विभागाने  चा:या लवकर दुरुस्त केल्या नाही म्हणून पाणी लांबले. शेतक:यांनीही अधिकाधिक पाणी अर्ज भरले नाही व स्वत:च्या पाटचा:या दुरुस्त केल्या नाही म्हणूनच शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित राहिला. (वार्ताहर)पाटचारी दुरुस्ती झाली युध्दपातळीवर‘लोकमत’ने मन्याडचे आवर्तन लांबणीवर असे वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची  पाटबंधारे विभगाने  दखल घेत युध्द पातळीवर चा:यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले. चा:यांची दुरुस्ती हाती घेतल्याने पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात पाणी मिळणार असाही अंदाज वर्तविला होता. आणि  पाटबंधारे विभागाने  दिवस-रात्र एक करून पहिल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी धरणाचे गेट उघडले. यासाठी  प्र. शाखाधिकारी, हेमंत पाटील, जे.डब्ल्यू. सूर्यवंशी, एस.बी.पाटील, सी.एन.पाटील व  कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. असा होणार लाभसध्या चारी क्र.10 व 11 ला पाणी सोडण्यात आले असून 6 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले. ते दुस:या दिवशी म्हणजे  7 रोजी सायंकाळी 6 वाजता आडगाव शिवारात पोहचले. कपाशीला पाणी भरुन फरदड घेण्याच्या तयारीत शेतकरी आहे तर काही शेतकरी उन्हाळी बाजरी घेण्याच्या तयारीत आहेत. पाणी सुटल्यामुळे सध्या शेता शेतांमध्ये शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.