शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मामा पुन्हा शहराला मामा बनवू नका हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

आमदार भोळे यांच्या पत्रपरिषदेला सुनील खडके यांचे उत्तर जळगाव : शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ...

आमदार भोळे यांच्या पत्रपरिषदेला सुनील खडके यांचे उत्तर

जळगाव : शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पुन्हा कोट्यवधींच्या वल्गना केल्या आणि शहराला पुन्हा मामा बनविण्याचा प्रयत्न केला. मुळात आम्ही जी मंडळी स्वतंत्र गटात बसलो त्यांची पक्षाबद्दल कोणतीही तक्रारच नव्हती. जी तक्रार आहे ती आमदारांच्या कार्यशैलीबद्दल आहे. सन्माननीय आमदार म्हणतात की निधी आणला. अहो पण आलेला २५ कोटी निधीही जर तीन तीन वर्ष खर्च करता येत नसेल तर मग तुमचा कारभार नियोजन शून्य होता हे का मान्य करत नाहीत ? अशा शब्दात माजी उपमहापौर सुनील खडके यांनी आमदार भोळे यांना उत्तर दिले आहे.

खडके यांनी याबाबत पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात म्हटले आहे की, आज शहराची जनता वैतागली आहे. रस्त्यांची कामे कागदोपत्री मंजूर करायची, धूळफेक करायची, निविदा प्रक्रियेपर्यंत आले की पुन्हा बदल करायचे.. होत असलेल्या प्रत्येक कामात घोळ घालायचा ही आमदारांची नियोजनशून्य कार्यपद्धती आहे. उपमहापौर म्हणून मी दौरा सुरु केला तो काही स्वतः साठी नव्हता. जनतेत जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात त्यासाठी होता कारण आज शहरातील नागरिकांमध्ये रोष आहे. वास्तविक असे अभियान आमदार महोदयांनी राबविणे गरजेचे होते. पण ते राहिले दूर तेव्हा ही आमदारांनी या अभियानाची पत्रकार परिषदेत खिल्ली उडविली होती.

पदासाठी अथवा वैयक्तिक लाभातून अथवा लोभातून एक दुसरा सदस्य बाहेर पडू शकतो जेव्हा निम्मे सदस्य बाहेर पडतात तेव्हा आमदारांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा टोलाही खडके यांनी आमदार भोळे यांना लगावला आहे.