धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या जवाहर स्टेडियम येथे सोमवारी झालेल्या कुस्ती स्पर्धेत मल्लाला कमी गुण दिले या कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़देवपुरातील जवाहर स्टेडियममध्ये सोमवारी रात्री कुस्तीची स्पर्धा झाली़ या स्पर्धेत मल्लाला कमी गुण दिले या कारणावरून शाब्दिक वाद झाला़ त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात आकाश गणेश परदेशी, रा़ जुने धुळे याने फिर्याद दिली़ त्यानुसार, सागर तांबडे, सचिन पाटील, विक्की शिंपी, शुभम देशमुख, पवन शिंपी, शिवाजी पाटील, अजय तांबडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत़ तर याच प्रकरणात सागर तांबडे याने दिलेल्या फिर्यादीवरून मुन्ना वाडिले, सुभान वाडिले, मनोज जाधव व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत़
कुस्तीत कमी गुण दिल्याने मल्लांची फ्री स्टाईल
By admin | Updated: April 4, 2017 23:48 IST