शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून अडचणी सोडवून अधिकाधिक नाटय़ प्रयोग व्हावे, जळगावात स्थानिक रंगकर्मीशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:49 IST

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील सदस्यांची सकारात्मक भूमिका असल्याची ग्वाही

ठळक मुद्देस्थानिक कलावंतांना संवादातून प्रोत्साहनकलावांतांनी मांडल्या अनेक सूचना

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24- नाटक, नाटय़कर्मी यांच्यासाठी रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाची सकारात्मक भूमिका असून याद्वारे कोणाचीही अडवणूक होऊ नये तर येणा:या अडचणी समन्वयातून सोडविल्या जाव्यात व अधिकाधिक नाटकांचे प्रयोग व्हावे हाच दृष्टीकोन मंडळाचा असल्याचा आहे, अशी ग्वाही रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील (सेन्सार बोर्ड) पदाधिका:यांनी स्थानिक रंगकर्मीशी संवाद साधताना दिली.रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे पदाधिकारी (सेन्सार बोर्ड) व जळगाव जिल्ह्यातील रंगकर्मीच्या संवादाचे आयोजन बुधवारी सकाळी  मू.जे. महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.  त्या वेळी पदाधिका:यांमधून हा सूर उमटला. या वेळी  मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे, सदस्य अशोक समेळ, गिरीश दाबके, प्रवीण कुळकर्णी, रमेश थोरात, चंद्रकांत शिंदे, गिरीश भूतकर, डॉ. दयानंद नाईक, मिलिंद टोकेकर, मानसी मागोकर, गीतांजली ठाकरे, आनंद देशपांडे, स्मिता भोगळे, कार्यालयीन सचिव संतोष  खामकर,प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी, प्रा.शरदचंद्र छापेकर, चंद्रकांत भंडारी, दिलीप वाघमारे, दत्तात्रय कुंभार, दिलीप साठे आदी  उपस्थित होते. 

समस्यांचे निराकरणसेन्सॉर बोर्डाचे कामकाज कसे चालते, काय नियम आहे, नवीन कोणत्या बाबी मंडळात सुरू आहे इत्यादी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली. तर स्थानिक कलावंतांकडून  समस्या मांडल्या आल्या व त्यांचे सदस्यांकडून निराकरण करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक, लेखक, कलावंतांची उपस्थिती होती.

 प्रयोगांना तात्काळ परवानगी, मात्र संहितेचेही काटेकोर पालन मंडळ प्रयोगांना तात्काळ परवानगी देत आहे. एकांकीकांमधून नवीन तरुण पिढी नाटकाकडे वळली असल्याने काही अडचण आल्यास आम्ही ती संहीता वाचून लगेच त्यांना सांगतो. तंत्रज्ञानामुळे  मोबाईलवर सर्व माहिती उपलब्ध होते आणि सकारात्मतेने आम्ही ते घेऊन मुलांना प्रोत्साहनासाठी अधिक सुखकर कसे होईल या भावनेने काम करत असल्याचे या वेळी सदस्य प्रवीण कुळकर्णी यांनी सांगितले. तर जातीयवाद संहीतेतून पसरणार नाही ना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तर ‘बोल्ड’ विषय हाताळताना मयार्दाही उलटता कामा नये हेदेखील आम्ही तपासतो असे अशोक समेळ म्हणाले.

कलावांतांनी मांडल्या अनेक सूचनावर्ष, सहा महिन्यात परीनिरीक्षण होणा:या नाटकांच्या लेखकांचा पत्ता, संपर्क क्रमांक वेबसाईटवर असावा, सध्या कोठेही मोठय़ा प्रमाणात एकांकिका सादर होतात त्यावर मंडळाचे नियंत्रण नाही का, तमाशातील वग, पथनाटय़ासाठी सेन्सारची काय भूमिका यासह विविध प्रश्न व समस्या कलावंतांनी मांडल्या. 

स्थानिक कलावंतांना संवादातून प्रोत्साहनअनेक ठिकाणी चांगल्या प्रमाणात नाटय़चळवळ सुरु आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा भागांमध्ये जाऊन तेथील कलावंतांशी संवाद साधत नाटय़ प्रयोगांसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे अरुण नलावडे यांनी सांगितले. तसेच या भेटीतून मंडळाचे कार्य कसे चालते या विषयी माहिती देऊन स्थानिक कलावंतांच्या काय समस्या आहे हे जाणून घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सेन्सॉर बोर्ड म्हटले की अनेक गुंतागुतींचे भाग असतात ही गुंतागुंत थांबवून, सहकार्याची भावना ठेवून हा उपक्रम सुरू केला असून ऑनलाईनद्वारेही बोर्डाची माहिती जाणून घेता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.