शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारातील मुख्य संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

एलसीबीची कारवाई : आणखी दोघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : व्हॉट्सॲपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून चौघुले प्लॉट ...

एलसीबीची कारवाई : आणखी दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : व्हॉट्सॲपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून चौघुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबार झाल्याची घटना रविवारी घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विजय जयवंत शिंदे (२३,रा.चौघुले प्लॉट) याला पकडण्‍यात एलसीबीच्या पथकाला यश आले असून त्यास बुधवारी पाळधीतून अटक करण्‍यात आली आहे.

विजय शिंदे याने व्हॉट्सॲपवर चिथावणे देणारे स्टेट्स ठेवले होते. याचा जाब विचारण्यासाठी विक्रम सारवान व त्याच्यासह काही जण रविवारी सायंकाळी चौघुले प्लॉट भागात आले होते. त्यावेळी सारवान व शिंदे गटात उफाळून गोळीबार झाला. तसेच दगडफेक सुध्दा झाली होती. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गोळीबारात विक्रम सारवान याच्या कानाला गोळी चाटून निघून गेली होती. त्यामुळे तो जखमी झाला होता. त्यानंतर याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्‍यात विजय शिंदे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, राकेश साळुंखे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला होता.

जळगाव तालुक्यात घेतला शोध

गोळीबारानंतर शिंदे गटातील सर्व फरार झाले होते. त्यांचा एलसीबीसह शनिपेठ पोलीस शोध घेत होते. गोळीबारातील मुख्‍य संशयिताचा एलसीबी पोलिसांनी जळगाव तालुक्यातील अमोदा, धार्डी, मितावली, भोकर, पाळधी आदी ठिकाणी शोध सुरू केला होता. मात्र, तो मिळून येत नव्हता.

अखेर साईबाबा मंदिर परिसरातून अटक

मुख्य संशयित आरोपी विजय शिंदे हा पाळधीतील साईबाबा मंदिर परिसरात असल्याची माहिती बुधवारी एलसीबी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी साईबाबा मंदिर गाठले. मंदिराच्या संरक्षक भिंतीजवळ तो उभा असल्याचे पोलिसांना दिसून आले. दरम्यान, पोलीस आल्याचे पाहताच, पळून जाण्याचा प्रयत्न करणार तोच पोलिसांनी त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील आदींनी केली आहे.

अन्य दोघांनाही अटक

गोळीबार प्रकरणातील संशयित किशोर शिंदे व राहुल शिंदे या दोघांना सुध्दा शनिपेठ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.