शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मार्शल आर्ट स्पर्धेच्या मुख्य आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:31 IST

23 स्पर्धकांची केली फसवणूक

ठळक मुद्देस्थानिक आयोजक फिरोज खान यांची माहितीराष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धकही

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 1 - राष्ट्रीय मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत नियमांचा भंग करुन सामने झाले. स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातील 23 स्पर्धक सहभागी झाले होते. सामने होऊनदेखील त्यांना प्रमाणपत्रे व पदके दिले नाहीत. प्रत्येक स्पर्धकाने सहभागी होण्याचे  दोन हजार शुल्क दिले असून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी शिमला येथील मुख्य आयोजक मास्टर भूपेंद्रसिंग आणि प्रिया रांटा यांच्या विरोधात चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती स्थानिक आयोजक मास्टर फिरोज खान यांनी बुधवारी दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.27 व 28 रोजी आर. के. लान्स येथे राष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. स्पर्धेत पहिल्या दिवसापासून वयोगटाबाबत नियम भंग केले गेले. रोहित नीलेश राणा आणि यश विजय गायकवाड या 14 वर्षाखालील स्पर्धकांना 19 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसोबत खेळविण्यात आले. या स्पर्धकांनी स्वत: पत्रपरिषदेत प्रकार कथन केला. अल्फिया शेखचा सामना शिमला येथील मुलाबरोबर लावण्यात आला. यावर आक्षेप घेतल्यानेच मास्टर भूपेंद्रसिंग आणि प्रिया रांटा यांना राग आला. स्पर्धा होऊनही रद्द करण्याचा अन्यायकारक निर्णय त्यांनी जाहीर केला. स्पर्धा भरविण्याची संपूर्ण जबाबदारी मास्टर भूपेंद्रसिंग व प्रिया रांटा यांचीच होती. त्यांनी आयोजनासाठी छदामही दिला नाही. असेही खान यांनी सांगितले. मास्टर भूपेंद्रसिंग याने पोलिस स्थानकात जीवे मारण्याची धमकी दिली. पंचांनी चुकीचे निर्णय दिले. स्पर्धेच्या ठिकाणी पालकही उपस्थित होते. चुकीचे निर्णय दिल्यामुळे पालकांचादेखील संताप झाला. पत्रपरिषदेच्यावेळी काही पालकांनीही आँखो देखी सांगितली. 23 स्पर्धकांचे प्रत्येकी दोन हजार असे 46 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविणार असल्याचे फिरोज खान यांनी सांगितले. 

राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धकही

शिवनाथ सजेर्राव राठोड या 23 वर्षीय स्पर्धकाला अफगाणिस्तानच्या हारुन स्पर्धकांसोबत खेळविले गेले. हा सामाना राठोड याने जिंकला. मात्र त्याला पराजित म्हणून घोषित केले. पत्रपरिषदेत शिवनाथने आपल्यावरील अन्याय कथन केला. यावेळी त्याच्या सामन्याची व्हीडीओ क्लिपही दाखवण्यात आली.