शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये महिलाराज

By admin | Updated: January 6, 2017 17:21 IST

आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती सभापतीपदासाठी शुक्रवार ६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 6 - आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती सभापतीपदासाठी  आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली. १२ ठिकाणी चक्रानुक्रमानुसार तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या दोन व सर्वसाधारण महिला या तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. यंदा ९ पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापतीपद १३ मार्च २०१७ पासून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, ग्रामपंचायत शाखेचे नायब तहसीलदार सुभाष सोनवणे उपस्थित होते.सुरुवातील जिल्हाधिकाऱ्यांनी १५ पंचायत समित्यांमध्ये असलेले सद्यस्थितीचे आरक्षण आणि चक्रानुक्रमे आरक्षणाची पद्धत समजावून सांगितली. शासनाने पंचायत समितीनुसार निश्चित केलेल्या आरक्षित जागांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती या जागांच्या पदासाठी एकुण लोकसंख्येची टक्केवारी उतरत्या क्रमाने लावून आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सन १९९५ ते २०१७ या दरम्यान चक्रानुक्रमानुसार आरक्षण घोषित करण्यात आले.ही प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन सभापतीपदासाठी तर सर्वसाधारण महिला या एक पदासाठी अशा तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली.पंचायत समितीनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणेजिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत समिती सभापतीपदासाठी घोषित केलेले आरक्षण पुढील प्रमाणे. जळगाव (अनुसूचित जाती महिला), मुक्ताईनगर (अनुसूचित जमाती महिला), एरंडोल (अनुसूचित जमाती महिला), अमळनेर (अनुसूचित जमाती),जामनेर (नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला),धरणगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला),भुसावळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), बोदवड (नागरिकांचा मागास प्रवर्ग), यावल (सर्वसाधारण महिला), रावेर (सर्वसाधारण महिला), पारोळा (सर्वसाधारण महिला),चाळीसगाव (सर्वसाधारण महिला), पाचोरा (सर्वसाधारण), चोपडा (सर्वसाधारण), भडगाव (सर्वसाधारण) असे आरक्षण राहणार आहे.९ पंचायत समित्यांमध्ये महिला राजशुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर ९ पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे. त्यात जळगाव, मुक्ताईनगर, एरंडोल,जामनेर, धरणगाव, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव या पंचायत समित्यांचा समावेश आहे. त्यात अनुसूचित जाती महिला १, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती महिला २, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २, सर्वसाधारण ३, सर्वसाधारण महिला ४ अशा जागा आहेत.