शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती : वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र २४ वर्षात कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:30 IST

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी लगत भूमिपूजन झालेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणी कागदी घोड्यावरच रंगत आहे.

ठळक मुद्देप्रकल्प कृतीत उतरवणे गरजेचेलोकप्रतिनिधींचा संताप अन्‌ आंदोलनाचा इशारा

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यात पाच वेळा सरकार बदलले, परंतु अद्याप वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी लगत भूमिपूजन झालेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणी कागदी घोड्यावरच रंगत आहे. प्रशिक्षण केंद्र आकारास येण्याचे तर सोडा महाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कारकिर्दीत जूनमध्ये ते नगर जिल्ह्यात हलविण्यात आले, सर्वच पक्षातून संतप्त भावना व्यक्त झाल्या आणि तीन महिन्यांनंतर कागदावरच ते मूळ स्थानी परतले.एखादा प्रकल्प मंजुरी, जमीन हस्तांतरण, कोनशीला अनावरण, भूमिपूजन, आर्थिक मंजुरी अशा विविध प्रशासकीय कामकाजातून पार पडल्यानंतरही प्रत्यक्षात कृतीत किंबहुना अस्तित्वात दिसून येत नसल्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी लगत उभारले जाणारे पोलीस प्रशिक्षण केंद्र होय. १९९५ मध्ये मंजुरी, १६० एकर जमिनीचे अधिग्रहण, १९९९ मध्ये तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे व पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन,२०१५ मध्ये तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी १०० कोटीची तरतूद मंजुरीचे आश्वासन, त्यानंतर २०१९ मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राचे स्वरूप बदलून राज्य राखीव सुरक्षा बल केंद स्थापना होणे नव्हे तर पदे भरण्यासही मंजुरी मिळाली. अशात जमीन अधिग्रहण व भूमिपूजन कोनशीला वगळता बाकी सर्व फक्त कागदावरच अशी वाटचाल गेल्या २४ वर्षात झाली. विद्यमान महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारकिर्दीत जून महिन्यात हे प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील जामखेड येथे हलविले गेल्याचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटरवरून लक्षात आले आणि जिल्हयातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी आणि नागरिक यांना गेल्या २४ वर्षापासून आकारात आल्याचे स्वप्नवत असलेले हे केंद्र गमविल्याची संतप्त भावना पुढे आली. हा प्रकल्प आणण्याचे श्रेय माजी मंत्री खडसे यांचेच. आज राष्ट्रवादीत असलेले खडसे जून महिन्यात भाजपात होते. सत्ताधाऱ्यांनी नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान दिले. शिवसेनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत जिल्हा बंद पुकारण्याचा इशारा दिला. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप लोकप्रतिनिधीतर्फे संताप व्यक्त झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प पुन्हा परतला; अर्थात तोही कागदावरच.महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीत नगर - जळगाव जिल्ह्या दरम्यान खान्देशी भाषेत डावला झालेल्या या प्रकल्पाला आता कृतीत उतरविण्याची खरी गरज आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMuktainagarमुक्ताईनगर