राष्ट्रवादी कॉंग्रेस
विधान परिषद व पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीला यश मिळाल्याचा आनंद पेढ़े वाटप करून व फटाके फोडून व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविन्द्र पाटील, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रोहिणी खडसे (खेवलकर), अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक, विकास पवार, वाल्मिक पाटील, राजेश पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अशोक पाटील, सलीम इनामदार ,मझहर पठाण, अजय बढे, तुषार ईगळे, संजय चौहान, साहिल पटेल , नईम खाटीक , राजेश गोयर, मोहन पाटील, मनोराज पाटिल, पराग पाटिल, जयश्री पाटील, अखील चौधरी. मधुकर पाटिल आदी उपस्थित होते.
शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी
विधान परिषदेच्या निकालाचा जल्लोष करण्यासाठी व सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी जळगाव शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हस्ते फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष शाम तायडे,अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष मनोज सोनवणे, अनुसूचित जाती जमाती महानगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष उद्धव वाणी, सरचिटणीस सुरेंद्र कोल्हे, दीपक सोनवणे, विष्णू घोडेस्वार, पी जी पाटील, शशी तायडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना
महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचा शिवसेनेतर्फेही फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी,रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे व नंदलाल पाटील , युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.