शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे रुग्णांना मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:16 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय : ३० रुग्णांनी घेतला लाभ

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राज्य शासनाच्या गरजू रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसात तब्बल ३० रुग्णांना योजनेचा लाभ मिळाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ५ एप्रिल २०२० पासून कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार व प्रशासक डॉ. बी.एन. पाटील यांच्या सूचनेनुसार अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोरोनाविरहित ओपीडी व वैद्यकीय सेवा सुरु केली आहे. योजनेचे कार्यालय मुख्य गेट क्रमांक १ च्या आवारात मध्यवर्ती भागात आल्यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे. राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे.या रूग्णांना मिळाला लाभकोरोना विरहित रुग्णालय सुरु झाल्यावर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून बुधवारी २३ डिसेंबरपर्यंत ७ दिवसात १६ कोरोना विरहित रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा अशा आजारांच्या १६ रुग्णांचा समावेश आहे. तर १४ कोरोना आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे. योजनेचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, आरोग्यमित्र दीपक पाटील हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव