शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील तरुणाची जळगावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:18 IST

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

ठळक मुद्देआधारकार्डावरुन पटली ओळखपोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद मृतदेह जिल्हा रुग्णालयात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 - जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमधील वाहन चालक संजय मांगीलाल राठोड (वय 35  मुळ रा.खुईखारवा, ता.खरगोन मध्यप्रदेश) या तरुणाने खान्देश सेंट्रल आवारातील झुडपात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय राठोड हा सुप्रीम कॉलनीत पांडे किराणाजवळ प}ी, दोन मुले,भाऊ व आई यांच्यासोबत वास्तव्याला होता. खान्देश सेंट्रल आवारात बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी काम करणारे मजुर गोविंदा लहु सोनवणे, पंकज पुंडलिक पाटील, समाधान नथ्थू डोळे व रवींद्र हिलाल गोपाळ (सर्व रा.बिलवाडी, ता.जळगाव) हे कामाच्या ठिकाणी जात असताना झुडपात निंबाच्या झाडाला एक जण गळफास घेतल्याचे त्यांच्या नजरेस पडले. या मजुरांनी लागलीच ही घटना बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या दिनेश पाटील यांना सांगितली. त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक निरीक्षक आशीष रोही, दुष्यंत खैरनार व सहका:यांनी घटनास्थळ गाठले.

पोलिसांनी मयताचे खिसे तपासले असता वरच्या खिशात आधारकार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड व किरकोळ पैसे होते. आधारकार्डवरील नाव व पत्यावरुन राठोडची ओळख पटली. जागेवरच पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळ व रुग्णालयात धाव घेतली.