शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जळगाव जिल्ह्यात घरफोड्या करणारी मध्यप्रदेशची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:58 IST

 जिल्ह्यात घरफोडी करुन धुमाकूळ घालणारी मध्यप्रदेशातील  चार जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून १३ ठिकाणच्या घरफोड्यांची त्यांनी कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबविली होती.

ठळक मुद्दे एलसीबी व यावल पोलिसांची कारवाई   रोख रक्कम व दागिन्यासह साडे पाच लाखाचा ऐवज जप्त  १३ घरफोड्यांची दिली कबुली

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२ :  जिल्ह्यात घरफोडी करुन धुमाकूळ घालणारी मध्यप्रदेशातील  चार जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल असा ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्या असून १३ ठिकाणच्या घरफोड्यांची त्यांनी कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबविली होती.यावल येथे ३१ आॅगस्ट रोजी रात्री शकील खान सुलतान खान (वय ५७, रा.बाबा नगर, यावल) यांच्या घरात बेडरुमच्या खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी ८५ हजार रुपये रोख, ३ लाख ६८ हजार रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये किमतीचे चांदीचे बिस्कीट व २१ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल असा ४ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलीस यांना संयुक्तपणे तपास करण्याचे आदेश दिले होते.

आरोपींकडून असा हस्तगत केला मुद्देमालसुनील बारेला याच्याकडून ३ लाख २२ हजार १८०, मुकेश चौहान याच्याकडून ३३ हजार ११०, राकेश बारेला याच्याकडून ८० हजार १२० तर अल्पवयीन आरोपीकडून १ लाख २४ हजार ६३५ असा एकुण ५ लाख ६० हजार ७९५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, दागिने व नऊ मोबाईलचा समावेश आहे.

या पथकाने केली कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुनील कुराडे, यावलचे निरीक्षक दत्तात्रय परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक सागर शिंपी, उपनिरीक्षक अशोक अहिरे, यावलचे युनुस तडवी, संजीव चौधरी, सिकंदर तडवी, संजय देवरे, संजय तायडे, विकास सोनवणे, सुशील घुगे, राजेश महाजन, सतीष भोई, राहूल चौधरी, जाकीर अली सैय्यद, एलसीबीचे मनोहर देशमुख, विजय पाटील, रवींद्र पाटील,नरेंद्र वारुळे, सुशील पाटील, आरसीपीचे अजय सपकाळे, गणेश पाटील, अमोल पाटील, मदन डेढवाल, विशाल पाटील, नितीन भालेराव, पवन देशमुख, गोपाळ गायकवाड, विजय बच्छाव व हनुमान वाघेरे यांच्या पथकाने सातपुडा जंगलात घेराव घालून सुनील अमरसिंग बारेला (वय २० रा.गौºयापाडा, ता.चोपडा), मुकेश काशिनाथ चौहान(वय २२ रा.खापरखेडा, ता.सेंधवा, जि.बडवाणी), राकेश उर्फ रायक्या रामलाल बारेला (वय २२ रा.देवळी, ता.वरली, जि.बडवाणी) व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.अटकेतील चारही आरोपींना पोलीस निरीक्षक  कुराडे यांनी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक कराळे यांच्याकडे हजर करण्यात आले.