वरणगाव, ता. भुसावळ : येथील दी वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे सचिव चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्षा वंदना पाटील, शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे, उपाध्यक्ष कमलाकर चौधरी, सदस्य राजेंद्र चौधरी, नीळकंठ सरोदे, मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यालयातील २०१०च्या बॅचमधील विद्यार्थी व सध्या नंदुरबार आरटीओ विभागामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी तेजस सुभाष देशमुख यांचा लेवा समाज अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मानस गोपाळ पाटील व संगीतशिक्षक आर. जे. इंगळे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सूत्रसंचालन व आभार मंगेश सोनार यानी केले.
म. गांधी विद्यालयात मोटार वाहन निरीक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST