शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जळगाव कृउबाच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन गटाचे लकी टेलर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 14:35 IST

खडसे गटाचे प्रभाकर पवार पराभूत

ठळक मुद्देप्रभाकर पवार यांनी मतदानापूर्वी घेतली लकी टेलर यांच्या उमेदवारीवर लेखी हरकतनिवडणुक अधिकाºयांनी फेटाळली हरकत.सभापतीपदाची पुढची संधी अनिल भोळेंना

जळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंगळवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या सभापती निवडणुकीत सुरेशदादा जैन गटाचे लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) व खडसे गटाचे प्रभाकर पवार यांच्यात लढत झाली. त्यात १७ पैकी १४ सदस्यांनी हात उंचावून लकी टेलर यांच्या बाजूने मतदान केल्याने ते विजयी झाले. तर प्रभाकर पवार यांनी मतदानात सहभाग घेतला नाही तर दोन सदस्य तटस्थ राहिले. पवार यांनी मतदानापूर्वी लकी टेलर यांच्या उमेदवारी अर्जावर लेखी हरकत घेतली. ती निवडणुक अधिकाºयांनी फेटाळली. मात्र मतदान घेण्याचा अधिकारच निवडणूक अधिकाºयांना नाही, असा दावा करीत पवार यांच्यासह तीन सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे उलटूनही सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने  त्यांच्या विरोधात अविश्वास  ठराव  मंजूर झाला होता. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या तीन संचालकांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या घडामोडीत भाजपाचे प्रविण भंगाळे यांनीही सेनेला पाठिंबा देत सेनेची संख्या १४ झाली होती.  ऐनवेळी अर्ज दाखलसभापती निवडीसाठी कृउबा संचालक मंडळाची विशेष सभा मंगळवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता कृउबातील सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ११ वाजून १० मिनिटांनी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले. त्यात अनिल बारसू भोळे, प्रभाकर गोबजी पवार यांनी प्रत्येकी १ तर लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी प्रभाकर पवार यांनी लकी टेलर हे विकसो गटातून निवडून आले असले तरीही त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची लेखी हरकत घेतली. मात्र निवडणूक अधिकाºयांनी ही संचालकपदाची नव्हे तर सभापती पदाची निवडणूक असल्याचे सांगत ही हरकत फेटाळून लावली. तसे लेखी उत्तर पवार यांना दिले. मात्र पवार यांनी ते उत्तर स्विकारण्यास नकार देत निवडणूक अधिकाºयांनी मतदान घेऊ नये, त्यांना अधिकार नाही, असा दावा करीत विरोध केला.

उमेदवार, अधिकाºयांची फोनाफोनीपवार यांच्या हरकतीनंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. निवडणूक अधिकारी शिवाजी बारहाते यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच पवार यांनीही फोनाफोनी केली. त्यामुळे लकी टेलर यांनीही सभागृहातून बाहेर येत फोनाफोनी केली. त्यानंतर ते पुन्हा आत गेले. या वादावादीनंतर अखेर निवडणूक अधिकाºयांनी निवड प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. पवार यांना हरकत फेटाळल्याचे पत्र दिले मात्र त्यांनी ते स्विकारले नसल्याबाबत कैलास चौधरी यांच्यासह चौघांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरीही घेतली. त्यानंतर माघारीसाठी मुदत देण्यात आली.हात उंचावून मतदानमाघारीच्या मुदतीत अनिल बारसू भोळे यांनी लकी टेलर यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे प्रभाकर पवार व लकी टेलर यांचेच अर्ज उरले. त्यावर हात उंचावून मतदान घेण्याची मागणी १३ सदस्यांनी केली. ती निवडणूक अधिकाºयांनी मान्य केली. त्यानुसार मतदान झाले.  त्यात १४ सदस्यांनी मतदान केले. तर प्रभाकर गोटू सोनवणे व प्रकाश नारखेडे यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. तर प्रभाकर पवार यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे लकी टेलर विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाºयांनी घोषीत केले,फटाक्यांची आतषबाजीनिवड झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारातच फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल-ताशांच्या जल्लोषात गुलाल उधळला.

सभापतीपदाची पुढची संधी अनिल भोळेंनालकी टेलर यांनी सांगितले की, त्यांचे खंदे समर्थक अनिल बारसू भोळे यांना या टर्मच्या शेवटी काही दिवस सभापतीपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच ३ वर्षात सुरेशदादांनी दिलेल्या आदेशानुसार वेळोवेळी उपसभापतीपदाची संधी दिली जाईल. आताही उपसभापतीपदाचा बदल करण्यात येणार असून मनोहर भास्कर पाटील यांना संधी दिली जाणार आहे.

सर्वांना सोबत घेऊन पारदर्शी कामकाज करूनिवडीनंतर नूतन सभापती लकी टेलर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कृउबात शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व हमाल मापाडी या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. तसेच पारदर्शकपणे व्यवहार करू. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहील. माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठबळामुळेच हे पद मिळविता आले. त्यांचा तसेच सहकारी संचालकांचा आभारी आहे.