शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगलांचे महाविद्यालयातच अश्लील चाळे

By admin | Updated: July 31, 2014 15:07 IST

'प्रेम करू या..खुल्लम खुल्ला' या मराठी चित्रपटातील गाण्याची प्रचिती भर सकाळी नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकांना आली.

 

जळगाव : 'प्रेम करू या..खुल्लम खुल्ला' या मराठी चित्रपटातील गाण्याची प्रचिती भर सकाळी नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकांना आली. महाविद्यालयात सकाळी तासिका सुरू असताना एका वर्गात दोन प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले. 'या पुढे असे प्रकार करताना दिसून आल्यास याद राखा' या शब्दात या प्रेमीयुगुलांना समज देऊन घरी पाठविले. दिवसभर या घटनेची शहरात चर्चा होती. 
गेल्या काही दिवसात असले प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहे. त्यावर 'वॉच' ठेवणारे व वचक ठेवणारे कोणीही नाही. त्यामुळे प्रेमीयुगुल त्यांना मनाला वाटेल त्या पद्धतीने वागत आहेत. असाच प्रकार नूतन मराठा महाविद्यालयात बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला. बेंडाळे महिला महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी नूतन मराठा महाविद्यालयात आल्या. दोन विद्यार्थी त्यांना महाविद्यालयातील एका वर्ग खोलीत नेऊन ईल चाळे करत असताना ही बाब काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती महाविद्यालयातील प्राध्यापक व उप्राचार्यांना दिली. त्यानंतर संबंधित प्रेमीयुगुलांना प्राध्यापक व उपप्राचार्यापुढे उभे करण्यात आले. त्यांना याबाबत जाब विचारला असता दोन्ही मुली बेंडाळे महिला महाविद्यालयातील असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांना नूतन मराठात बोलविण्यात आले. त्यांनीही या प्रेमीयुगुलांना समज दिली. त्यानंतर या प्रेमीयुगुलांना घरी सोडण्यात आले. 
'लोकमत'ने केले होते स्टींग ऑपरेशन
नूतन मराठा महाविद्यालयालगत एका अरूंद रस्त्यावरही भरदिवसा प्रेमीयुगुल थांबलेले दिसतात. त्यातच या रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे प्रेमीयुगुलांचे ईल चाळे सुरू असल्याने या रस्त्यावरून नागरिकांना मान खाली घालून जावे लागत आहे. हा प्रकार 'लोकमत'ने काही दिवसांपूर्वी केलेल्या स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आला होता. 
असे घडलेच नाही 
प्रेमीयुगुलांना तंबी देणारे उपप्राचार्य डी. पी. पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले आहे. प्राचार्य आर. बी. सुर्वसे बुधवारी रजेवर होते. तरीही त्यांना या प्रकाराबद्दल विचारले असता हे प्रकरण माझ्या कानावर आले आहे. मात्र, खरे काय ते सांगू शकत नाही, असे ते म्हणाले.
-----------
असे प्रकार सुरू असताना विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाविद्यालयातील यंत्रणा कमी पडत असल्याचे आजच्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. तासिका सुरू असतानाही विद्यार्थी बाहेर जातात. परत आल्यावर त्यांना 'लेर' का केले नाही? असे विचारण्यात येत नसल्यामुळे मुले 'बिनधास्त' झाल्याचा सूर ज्येष्ठ व्यक्तींमधून उमटू लागला आहे. 
-----------
असा काहीही प्रकार घडलेला नाही. तुम्हांला मिळालेली माहिती खोटी आहे. -डी.पी.पवार, उपप्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय 
-----------
नूतन मराठा महाविद्यालयात सकाळी घडलेल्या प्रकाराबद्दल बोलविण्यात आले होते. संबंधित मुला-मुलींना समज देण्यात आली. आमच्या महाविद्यालयातील मुली होत्या. मात्र, त्या नेमक्या कोणत्या कारणाने तेथे गेल्या हे मी सांगू शकणार नाही. - प्रा. एस. व्ही. ढाके, उपप्राचार्य, बेंडाळे महिला महाविद्यालय