शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

प्रियकरांची घेतली साथ अन् नव:याचा केला घात

By admin | Updated: March 6, 2017 00:35 IST

निरव शांततेच्या रस्त्यावरील घटना : एकाशी आधीच सूत जुळलेले अन् दोघे भेटले बाजारात

 चाळीसगाव : तिच्याशी एकाचे अगोदरच सूत जुळलेले.. अन्य दोघे बाजारात भेटले.. त्यांच्याबरोबरही आँख मिचौली झाली.. तिघांचा तिच्यात जीव रंगला.. त्यांचे हे अनैतिक इलू इलू मात्र तिच्या पतीला खटकायचे. आपल्या ‘त्रिकोणी लव्ह स्टोरी’तील नव:याचा अडसर दूर करताना तिने प्रियकरांच्या साथीने नव:याचा ‘गेमप्लॅन’ फत्ते केला. बेलगंगा भोरस रस्त्यावर झालेल्या खुनामागे असे हे ‘लव्ह नाटय़’ उघड झाले आहे.नांदगाव तालुक्यातील बोलठाण हे कैलास रंगनाथ पवार (वय 40) यांचे गाव. त्याचा आणि राधाबाईचा (वय 35) विवाह 10 वर्षापूर्वी झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये झाली. संसार सुरळीत सुरू असताना कैलासला दारू पिण्याचे व्यसन जडले. राधाबाईने याचा काहीसा फायदा घ्यायला सुरुवात केली.  याची चाहूल लागल्याने कैलासने तिला काही महिने तिच्या माहेरी पोहोचवून दिले. तो कामासाठी काही काळ सुरत येथे गेला.  मुले लहान असल्याने त्याने राधाबाईशी समझोता करून तिला पुन्हा आपल्यासोबत आणले. काही दिवसांनंतर  कैलास आणि राधाबाई यांच्यात खटके उडू लागले. नव:याच्या या जाचातून सुटण्याचा विचार तिच्या मनात घोळू लागला.पहिले सूत गौतमशीलोहारी, ता.पाचोरा येथे राधाबाईचा भाऊ राहतो. तिचे भावाकडे येणे जाणे असल्याने त्याचा मित्र गौतम धना सोनवणे याच्याशी राधाबाईची ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये सूत जुळले. त्याच्या मोबाइलवरून संपर्कही सुरू झाला.  गौतम आणि राधा यांच्या प्रेमाबाबतचा  पुसटसा अंदाज कैलास यास आला होता.दोघे भेटले बाजारातसाहेबराव निकम कोळी आणि उमेश उर्फ गुडय़ा वना पाटील हे दोघेही उंबरखेड, ता.चाळीसगाव येथील रहिवासी. पाच ते सात महिन्यांपूर्वी राधाबाई पती कैलाससह चाळीसगावी बाजारासाठी आली होती. आठवडे बाजारातच कैलास आणि राधाबाईचे भांडण झाले. त्या वेळी कैलास दारू प्यायला होता. त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न उमेश उर्फ गुडय़ा वना पाटील व साहेबराव कोळी यांनी केला. कैलास व या दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. दरम्यान, राधाबाईने दोघांचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यांच्याशी पुढे संपर्क केला. या दोघांशी तिची लव्ह स्टोरी सुरू झाली. राधाबाईच्या त्रिकोणी प्रेमाला बहर आला. कैलासला याचा मागमूसही राधाबाईने लागू दिला नाही.मध्यरात्रीचा थरार आपल्या अनैतिक संबंधांना कैलास विरोध करतो. याचा राग राधाबाईच्या मनात घुमसू लागला. तिने या तीनही  प्रियकरांसोबत कैलासच्या खुनाचा कट रचला. 19 फेब्रुवारी रोजी तब्येत दाखविण्यासाठी जायचे आहे, असे सांगत राधाबाईने कैलासला चाळीसगावी आणले. ठरल्यानुसार गौतम, साहेबराव आणि उमेश हेदेखील चाळीसगावी आले. रात्री 11 वाजता मालेगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पाचही जणांची ओली पार्टी सुरू झाली. 12 वाजता घरी जायचे म्हणून ते तेथून            उठले. अन् ती बसली दुचाकीवरगौतमच्या मोटारसायकलवर कैलासला बसविले. याच दरम्यान साहेबराव यास त्याच्या मोटारसायकलवर पेट्रोल घेण्यास पाठविले. उमेशच्या मोटारसायकलवर राधाबाई बसली. गौतम कैलासला घेऊन बेलगंगा-भोरस या सुनसान रस्त्यावर आला. त्याने कैलासला मारहाण करायला सुरुवात केली. त्यास खाली पाडत डोक्यात दगड घातला. तो जिवंत असतानाच साहेबरावने आणलेले पेट्रोल त्याच्या अंगावर टाकत पेटवून दिले. तिघे तेथून पसार झाले तर राधाबाई पहाटेच्या गाडीने बोलठाण येथे पोहोचली.अन् पोलिसांनी आवळल्या मुसक्याराधाबाईने बोलठाण येथे कैलासच्या आई-वडिलास व  भावास तो नंतर येत असल्याचे सांगितले. 19 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अर्धवट जळालेल्या अज्ञात इसमाची प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. शवविच्छेदनानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचे निष्पन्न झाले आणि  अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दोन दिवस उलटूनही कैलास घरी परतला नाही म्हणून त्याच्या नातेवाइकांनी नांदगाव पोलिसात तो हरविल्याची तक्रार दिली. चाळीसगाव पोलिसांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाबाबत लगतच्या पोलीस ठाण्यांना कळविले होते. नांदगाव पोलिसांनी कैलासच्या नातेवाइकांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. 21 रोजी राधाबाई व अन्य नातेवाईक चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात  आले. या वेळी मयत कैलासचे कपडे नातेवाइकांनी ओळखले.  जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व डीवायएसपी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांची टीम मनोहर जाधव, विनोद भोई, किशोर पाटील, विकास पाटील, नीलेश पाटील, दीपक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. तिच्या जबाबातील विसंगतीराधाबाईचा जबाब व घटनाक्रम यात विसंगती आढळल्याने त्यांनी तिच्यावरच फोकस केला. ती बाहेरख्याली असल्याबद्दल नातेवाइकांनीही सांगितले. राधाबाईला पोलीस खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली. गौतम, उमेश व साहेबराव यांच्यावर पोलिसांनी झडप घालत त्यांनाही जेरबंद केले. चौघांनी खुनाचा गुन्हा कबूल केला. अवघ्या पाच दिवसात आरोपींना अटक झाल्याने 27 रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना 7 मार्चअखेर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.