शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरवित आहोत पण उकाड्याचे आणि असुविधांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोविड सेंटरची पंख्यावर मदार : मे हिटमध्ये होणार रुग्णांचे हाल : उपाययाेजना गरजेची लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या ...

कोविड सेंटरची पंख्यावर मदार : मे हिटमध्ये होणार रुग्णांचे हाल : उपाययाेजना गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यासुध्दा समाधानकारक आहे. आतापर्यंत १ लाख ४ हजार ९०६ लोकांनी कोरोनाला हरवून दाखविले असून, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान, सध्‍या तापमान वाढले आहे. परिणामी, काही कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांना घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. अशा तापमानात कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. मात्र, काही ठिकाणी कोणीही लक्ष देत नाही, अशी तक्रार कोरोना रुग्णांची आहे. जिल्ह्यात २५ कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी रुग्णांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन परिसर स्वच्छ ठेवला जातो. सध्या तापमान वाढले आहे. दुपारच्या सुमारास प्रचंड उकाडा जाणवतो. उकाड्याचा रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून काही ठिकाणी एसी, कुलर्स लावण्‍यात आले आहेत. मात्र, ज्याठिकाणी या सुविधा नाहीत, अशा ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे दररोज हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून येत असताना, बरे होणाऱ्यांचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. आतापर्यंत १ लाख १७ हजार ९१६ कोरोना बाधित आढळून आले. त्यातील १ लाख ४ हजार ९०६ रुग्णांनी कोरोनाला हरवून दाखविले आहे, तर २ हजार ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० हजार ९११ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

एप्रिल महिना तापला

- फेब्रुवारी व मार्च महिना कसा तरी रुग्णांनी कोरोना केअर सेंटरवर काढला. आता एप्रिल महिनाही तापला आहे. एप्रिल महिन्याचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मे महिना बाकी असून, त्यामुळे काही ठिकाणी रुग्णांसाठी सुविधा करणे गरजेचे आहे.

- १० हजार ९११ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यात ७ हजार ७०७ रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, तर ३ हजार २०४ रुग्णांना गंभीर लक्षणे आढळून आली आहेत.

==================

उकाड्याचाही होतोय त्रास

सेंटरमध्ये पंखे आहेत. सध्या तापमान वाढल्यामुळे दुपारी उकाडा जाणवतो. त्याचा थोडा त्रासही होता. पण, दोन ते तीन दिवस बाकी आहेत. कुठे ओरड करीत बसणार आहे. मात्र, इतर सुविधा उत्तम मिळत आहेत.

- बाधित रूग्ण...

केंद्र शहरापासून दूर आहे. पण, प्रत्येकाची काळजी घेतली जाते. सेंटरमध्ये पंखे आहेत. थोडाफार उकाडा जाणवतो. मग, सायंकाळी आम्ही रुग्ण खोलीच्या बाहेर येऊन बसतो. आमची काही तक्रार असली तर त्याची लागलीच दखलसुध्दा घेतली जाते.

- बाधित रूग्‍ण...

=================

एकूण कोविड केअर सेंटर - २५

उपचार सुरू असलेले बाधित रुग्ण - १० हजार ९११