भुसावळ : चाकूचा धाक दाखवून टिंबर मार्केटमध्ये काम करणाºया मजुराला लुटण्यात आले. ही घटना ७ रोजी सायंकाळी टिंबर मार्केट भागात घडली. याबाबत बाजारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अरुण उत्तम रणधीर (वय ४५) रा. राहुलनगर हे टिंबर मार्केटमध्ये मजूर म्हणून काम करीत असताना आरोपी शम्मी प्रल्हाद चावरिया रा.वाल्मीकनगर याने अरुण रणधीर यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या मजुरासही आरोपीने धमकावले आहे, असे पोलिसांनी सांगितले. घटना समजताच बाजारपेठचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे फौजदार ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ८ मार्च रोजी बाजारपेठ पोलिसांनी गुरनं.५२/२०१७ भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास फौजदार काझी करीत आहेत. टिंबर मार्केट भागात गस्त वाढवादरम्यान, टिंबर मार्केट हा भाग रेल्वे लाईनला लागून आहे.या भागात गुन्हेगारांचा वावर आहे. पोलिसांनी या भागात दिवसा व रात्रीदेखील गस्त वाढविण्याची गरज आहे.
चाकूचा धाक दाखवून मजुराला लुटले
By admin | Updated: March 9, 2017 00:32 IST