धुळे : कारमध्ये गंभीर रुग्ण असल्याचा बहाणा करून हॉस्पिटलबाहेर बोलावून डॉक्टर चेतन देसले यांना मारहाण करण्यात आली आणि 45 हजारांची सोन्याची साखळी लांबवल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिसात मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े दरम्यान चौघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ शहरातील साक्री रोडवरील सिद्धिविनायक हॉस्पिटलमधील डॉ़चेतन माधवराव देसले (वय 32) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुणाल गवळीसह चार जण हॉस्पिटलमध्ये आल़े पुढे अतिदक्षता रूममध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी असलेले डॉ़चेतन देसले यांना खाली कारमध्ये गंभीर रुग्ण आह़े तुम्ही त्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलबाहेर या असे सांगितल़े डॉ़देसले हे रुग्णाला पाहण्यासाठी हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या कारजवळ आल़े तेव्हा कारमध्ये बसलेले इतर तीन जण आणि जवळ उभ्या असलेल्या गवळी याने लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने व फाईटने कपाळ, पोट व छातीवर मारहाण केली़ डॉक्टरांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची 45 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी ओढून चौघेही कारने पसार झाल़े याप्रकरणी कुणाल अजरुन गवळी (रा़ मोगलाई) व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सैयद करीत आहेत़ घटनास्थळी पोलीस अधिका:यांची भेट घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, पोलीस उपनिरीक्षक बी़ डी़ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ चौघे फरार, पथक रवाना डॉक्टर चेतन देसले यांना मारहाण केल्यानंतर चौघे कारने फरार झाल़े त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथकदेखील रवाना झाले आह़े लवकरच चौघांना अटक करण्यात येईल, असे तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक सैयद यांनी सांगितल़े
डॉक्टरांना मारहाण करून लुटले
By admin | Updated: October 25, 2015 23:57 IST