शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ओटीएसअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:55 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटींची कर्जमाफी

ठळक मुद्देस्वहिस्सा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत १० हजार शेतकºयांना झालीय ११४ कोटींची कर्जमाफी

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १६ हजार ८५ शेतकºयांनी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेखाली त्यांच्या हिश्याची दीड लाखांच्यावरील रक्कम न भरल्याने त्यांची सुमारे ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे. दरम्यान शासनाने ही रक्कम भरण्यासाठी योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढविली आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजने अंतर्गत दीड लाखांच्या थकबाकीला माफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ज्या शेतकºयांची थकबाकी दीड लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (ओटीस) योजना आणली. त्यात पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्याची म्हणजेच दीड लाखांच्यावरील उर्वरीत संपूर्ण रक्कम शासनाला भरल्यानंतर त्यांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार होता. ही रक्कम भरण्याचा कालावधी दिनांक ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत होता. जिल्ह्यात २५ हजार ८५८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असल्याने त्यांनी स्व-हिस्सा भरल्यास त्यांना २२४ कोटी २१ लाख २३ हजारांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या मुदतीत केवळ ९७७३ शेतकºयांनीच स्व-हिस्सा भरल्याने त्यांना ११३ कोटी ७१ लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उवररीत १६ हजार ८५ शेतकºयांनी त्यांची स्व-हिस्सा रक्कम न भरल्याने त्यांची ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे.ओटीएस योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत शेतकºयांनी स्व-हिस्सा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली असून आता ही मुदत ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आह, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतक-यांनी आपल्या हिश्याची रक्कम वरील मुदतीत बँकामध्ये भरुन सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९८३ कोटींची कर्जमाफीजळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १० ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून त्यात २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटी १२ लाखांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात जिल्हा बँकेच्या १ लाख ९४ हजार ४९८ खातेदारांना ७५८ कोटी ७९ लाखांची तर राष्टÑीयकृत बँकांच्या ४० हजार ३१ लाभार्र्थींना २२४ कोटी ३३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. विशेष म्हणजे राष्टÑीयकृत बँकांकडे मात्र त्यांच्याकडील कर्जमाफीची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समजते. अद्यापही शासनाकडून ग्रीनलिस्ट येतच असून नुकतीच जाहीर झालेली ११ ग्रीन लिस्ट जाहीर होताच रद्द झाली आहे.