शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गाव कारभा-यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान, जळगावच्या गौरव सोहळ्यात भारावून गेले 13 सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:11 IST

‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’चे थाटात वितरण

ठळक मुद्दे 108 प्रस्ताव सादरपुरस्कारावेळी माहितीची चित्रफीत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 09- ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाडय़ाचा कारभार करणा-या जळगाव जिल्ह्यातील 13 सरपंचांना मंगळवार, 9 रोजी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. कांताई सभागृहात सुमारे साडेतीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे एकप्रकारचे विचारमंथनच ठरले.गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभा:यांना बीकेटी टायर्स प्रस्तुत ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्स 2017 ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार,    जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्‍जवला पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी,  ‘लोकमत’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, अॅग्रो सेल्स बीकेटी टायर्सचे सहाय्यक व्यवस्थापक जुबेर शेख, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद सप्तकोटेश्वर, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे एरिया मॅनेजर सारंग जोशी  यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पहिल्या वर्षी केलेल्या आवाहनाला जळगाव जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी 108 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रारंभी दीपप्रज्वालन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वालन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारावेळी माहितीची चित्रफीत दाखविण्यात आली. हे पाहून सरपंचांसह उपस्थित भारावून गेले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले. 

‘लोकमत’ने सन्मानित केलेले विजेते सरपंच सरपंच ऑफ द ईयर- पुरजीत चौधरी (डांभुर्णी, ता.यावल), वीज व्यवस्थापन - चंदना पाटील (लोणपिराचे, ता.भडगाव.), शैक्षणिक सुविधा - सुदाम देवरे (लासुरे, ता.पाचोरा), स्वच्छता -  पंडित माळी (बोरनार, ता.भडगाव), आरोग्य - परवीनबी शेख (गालापूर, ता.एरंडोल), पायाभूत सुविधा - आनंदा ठाकरे, (साकेगाव, ता.भुसावळ), ग्रामरक्षण - अतुल देशमुख, (तळेगाव, ता.चाळीसगाव), पर्यावरण संवर्धन - नरेंद्र पाटील, (मनवेल, ता.यावल), प्रशासन/ई-प्रशासन - अमोल भोसले (चितेगाव, ता.चाळीसगाव), रोजगार निर्मिती - मीनाबाई हटकर, (पिंपळकोठा खुर्द, ता.एरंडोल), कृषी तंत्रज्ञान - डॉ.कमलाकर पाटील (फुपणी, ता.जळगाव), जल व्यवस्थापन - विकास चौधरी (वाघळी, ता.चाळीसगाव), उदयोन्मुख नेतृत्व - कमलाकर पाटील (पाळधी, ता.जामनेर).