लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : येथील स्टेशनरोड परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण व जीन भागातील एक रुग्ण असे तीन डेंग्यू रुग्ण आढळल्याने कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्यासाठी गावात पाठविले असून, दि. १७ पासून डेंग्यू सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
स्टेशनरोडवरील रहिवासी माजी ग्रामपंचायत सदस्य हाजी शफी मण्यार यांचे नात व नातू अली मोसिम मण्यार (७), रिदा मोसीम मण्यार (१०) तसेच नागद रोडवरील जीन भागातील तेजस्विनी ईश्वर हिरे (८) ही तीन बालके डेंग्यू बाधित निघाल्याने त्यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही माहिती कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांना मिळताच त्यांनी तत्काळ गावात आरोग्य पथक पाठवून सर्वेक्षण सुरू केले.
या पथकामध्ये कजगाव येथील आरोग्य सहायक रमेश राठोड, श्रीकांत मराठे, आरोग्य सेवक विकास चव्हाण, रवींद्र सूर्यवंशी, राजेश खैरनार, राजेश, किरण पाठक, सुरेश वानखेडे, संजय सोनार कळवाडीकर, आशा स्वयंसेविका आशा महाजन यांनी काम करून घरोघरी जाऊन जनजागृती केली.
170721\17jal_9_17072021_12.jpg
गावात सर्व्हेक्षण करताना आरोग्य पथक