शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जामठी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 22:31 IST

सदस्यांचा रोष । ग्रामसेवक गैरहजर असल्याने कामांचा खोळंबा

बोदवड : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी टाळे ठेकले.गत महिन्याभरापासून सतत दांडीमारुन गैरहजर राहत असलेले ग्रामसेवक जी. एच. राठोड यांच्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक दाखले, उतारे, मिळत नसल्याने ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.गेल्या काही दिवसांपासून राठोड हे ग्रामपंचायत कार्यालय येथे येत नसल्याने नागरिकांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच गेल्या चार महिन्यांपासून मासिक मिटिंग घेण्यात आली नसतांनाही खर्च मात्र वारेमाप होत असून गेल्या एक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. तेरिज पत्रक संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी उप सरपंच देवीदास पाटील व सदस्यांनी केला.त्यामुळे या सर्व कारभाराची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावत असल्याचे त्यांनी २१ रोजी जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनावर येथील ग्रामपंचायत उपसरपंच देवीदास कडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर महाजन, विकास नारायण पाटील व नागरिकांच्या सह्या आहेत.