शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड तपासणी केंद्राला कुलूप, नागरिक बसले ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा हळूहळू वाढत असल्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे़ परिणामी, आता थोडे फार सुध्दा ...

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा हळूहळू वाढत असल्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे़ परिणामी, आता थोडे फार सुध्दा लक्षणे जाणवू लागली की नागरिक तपासणीसाठी केंद्रांवर गर्दी करीत आहे. त्यातच बुधवारी सकाळपासून शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) येथील केंद्रावर कोविड तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, दहा वाजूनसुध्दा केंद्राला कुलूप असल्याने नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागल्याचा प्रकार घडला. दरम्यान, केंद्राची जी वेळ आहे, त्याच वेळेला केंद्र सुरू झाले असल्याचे कोविड तपासणी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील वर्षी कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले होते. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. आता पुन्हा हा प्रादुर्भाव वाढत असून दररोज वीस ते तीस बाधित रुग्ण आढळून येणारी संख्या चारशेवर पोहोचली आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्याही वाढली असून अ‍ॅन्टीजेन व आरटीपीसीआर केंद्रांवर कोविड तपासणीसाठी रांगा लागत आहेत. बुधवारी शासकीय पॉलिटेक्निक येथे कोविड तपासणी केंद्रावर सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिक तपासणीसाठी आले होते़ गर्दी वाढल्यामुळे मोठी रांग लागली होती. केंद्रातील कर्मचारी सुध्दा हजर झाले होते. मात्र, दहा वाजूनसुध्दा केंद्राला कुलूप असल्यामुळे नागरिकांसह वयोवृध्दांना ताटकळत बसावे लागले. कर्मचाऱ्याने चावी आणल्यानंतर केंद्र उघडण्यात आले. नंतर नोंदणीला सुरुवात होऊन चाचणी करण्यात आली.

सकाळी दहा वाजता केंद्र सुरू होण्याची वेळ आहे. त्यावेळेवरच केंद्र सुरू होऊन नोंदणी केली गेली. नंतर नोंदणी झालेल्या नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली. सकाळपासूनच केंद्रावर तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी होत आहे.

- संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा