शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आथानी कैरी तथानी कैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:16 IST

फागणे, ता.धुळे येथील अभ्यासक तथा मुख्याध्यापिका रत्ना पाटील यांनी अक्षय तृतीयेचा गाण्यांच्या अनुषंगाने घेतलेला आढावा.

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला खान्देशी संस्कृतीचा एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया. आजही ग्रामीण भागात दिवाळीपेक्षा आखाजीचा उत्साह काही औरच़ सासुरवाशीण लेक आखाजीला माहेरी येते़ याचवेळेस गौराई ही माहेरपणाला आलेली असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी लेक गौराईला घ्यायला जावई शंकर येतो अन् गौराईच्या सख्या शंकराला चिडवतात, थट्टा करतात़उंदीर मारू भरीत करूयेरे शंकर जेवाले--आखाजीच्या दिवशी मातीची घागर भरून तिची पूजा करतात़ पुरणपोळी आम्ररस, रसोई -भात, पापड कुरडाई भाजी, सांजोरी करंजी, लाडू, खरबूज यांचा नैवेद्य दाखवून गौराई शंकराचे पूजन केले जाते़ पितरांना या जेवणाची आगारी टाकून तृप्त केलं जात़ं आजही वाडवडिलांना पुरणपोळी आंब्याच्या रसाचं जेवण दिल्याशिवाय हा स्वयंपाक केला जात नाही़आखाजीला माहेरपणाला आलेल्या लेकीच्या उत्साहाला सीमाच नसते़ जीवाभावाच्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात़ सुखदु:खाच्या गोष्टी होतात़ आखाजीला घराघरात अंगणातील झाडाला झोके बांधले जातात़ झोक्याच्या दोन सरींवर दोन मैत्रिणी बसून झोके घेत म्हणतात़आथानी कैरी तथानी कैरीकैरी झोका खाय वकैरी तुटनी खडक फुटणाजुयी जुयी पानी व्हाय वंजुयी जुयी पानी व्हाय तठेरतन धोबी धोय वंरतन धोबी धोये, तठे कसाना बाजार वरतन धोबी धोये तठे लच्छीसना बाजार वमाय माले लच्छा ली ठेवजोबंधुना हाते दी धाडजोबंधु मोठा सोनाना पलंग पाडू मोत्यानामाहेरी आखाजीला आलेल्या लेकीचं कौतुक करण्यात संपूर्ण घरच सज्ज झालेलं असतं़ तिला काय हवं नको ते पुरवण्यात मायमाऊली दंग झालेली असते़ संसाराचे व्याप ताप विसरून लेक सुखाचा झुल्यावर झोके घेत गात राहते़ गोराईला आठवत राहते़ सोनानी सुतसी नी पानी काढे शंकरहरी व माय केशरजंजनीपानी काढे शंकरहरीनी तठे मन्ही गौराई न्हायली व माय केशरजंजनीतठे मन्ही गौराई न्हायली णी पिवड्या पीतांबर नेसली व माय केशरजंजनी पिवड्या पीतांबर नेसनी आंगे कांचोळी घातली व माय केशरजंजनी आंगे कांचोळी घातली नी डोळे काजळ झिरीयिरी व माय केशरजंजनी डोळे काजळ झिरीयिरीनी कपाये कुंकुयानी चिरी व माय केशरजंजनी-- लेकीला आई हाक मारून जेवायला बोलावते- पण लेक झुला सोडायला तयार नसते. आईच्या हाकेला आवाज देत पुन्हा झुला झोका सुरू होतो़नदी नर्मदाना मेय व माय नर्मदाना मेय तठे काय सोनाना पिपय वं माय सोनाना पिपयत्याले काय चांदीन्या हालकड्या वं माय चांदीन्या हालकाड्यातठे बसे गौराई नारी वं मायबसे गौराई नारीझोका देये शंकरहरी वं मायदेये शंकर हरीझोका गगनले जाये माय गगनले जायेअसा हा पुढच्या आखाजीच्या झोक्याची वाट पहायला लावणारा, स्त्री शक्तीचा जागर घडवणारा, वयाचे भान विसरायला लावणारा प्रापंचिक व्यापा ताणातून सुटका करणारा सौख्याचा झोका--आखाजीचा झोका--आते आखाजी कही जी--विचारणारा़-रत्ना ज्ञानेश्वर पाटील, फागणे, ता.जि.धुळे

टॅग्स :literatureसाहित्यDhuleधुळे