अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर : पशुपालक गवळ्याच्या दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्याने उपजीविकेचे साधन संपल्याने पशुपालकाचे कुटुंब शोकसागरात बुडाले. पाच दुभत्या गायी अचानक रात्री दोन वाजेच्या दरम्यान मृत्युमुखी पडल्याने पशुपालक गवळी कुटुंबाने रात्र आक्रोशात काढली. कुटुंबाचे आकांत मन हेलावून टाकणारे होते. कान्हा गवळी या पशुपालकाची जनावरे चराईसाठी अंतुर्ली शिवारातील बाळू भागवत पाटील या शेतकºयाच्या शेतात बसली होती. ४ च्या मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान दुभत्या गायी खाली कोसळल्या अन् तत्काळ मृत्युमुखी पडल्या. औषधोपचारासाठी वेळ मिळाला नाही. चाºयात विषारी पदार्थ खाण्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला. अंतुर्ली सजाºया तलाठ्यांनी या घटनेचा पंचनामा करून अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सुनील पाटील, दिनकर पाटील, हरिभाऊ पाटील यांची घटनास्थळी भेट घेऊन आपद्ग्रस्त पशुपालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मृत्युमुखी सहाय्यता निधीतून संबंधित पशुपालकाला मदतीची मागणी केली. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाºयांना घटनेची दूरध्वनीवरून माहिती दिली. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना घटनेसंदर्भात माहिती देण्यासाठी सुनील पाटील यांनी दूरध्वनी केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण यांनी मृत जनावरांचे विच्छेदन केले. मृत जनावरांच्या व्हिसेराचे नमुने त्यांनी रासायनिक पृथक्करणासाठी ताब्यात घेतले. आपत्ती अजंदेनंतर अंतुर्लीत गायी दगावल्या...गेल्याच आठवड्यात रावेर तालुक्यातील अंजदा येथील शेतकºयांच्या सुमारे २०० मेंढ्या विषारी पाणी पिल्याने दगावून मोठी हानी झाली होती. तसाच काहीसा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे घडला आहे. विषारी चारा खाल्याने दुभत्या पाच गायी मृत्युमुखी पडल्याने गवळी कुटुंबावर आपत्तीच कोसळली आहे. त्यामुळे त्यांचा व कुुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
पशुपालकाचे उपजीविकेचे साधन हिरावले
By admin | Updated: April 6, 2017 00:37 IST