शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अत्यवस्थ तरुणाला जळगाव जिल्हा रुग्णालयात जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:11 IST

नातेवाईक नसताना महिनाभर संभाळ : आतडे फाटून पोटात झाल्या होत्या गंभीर जखमा

ठळक मुद्देमहिनाभर पूर्ण देखभालतरुण झाला ठणठणीतपोटात खोलवर जबर जखमा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - पोटामध्ये चाकूचा जीवघेणा वार होऊन आतडे फाटल्याने अत्यवस्थ असलेल्या रोहीत नम्रताप्रसाद तिवारी (18, रा. खंडवा, मध्यप्रदेश) या तरुणावर जिल्हा रुग्णालयात जोखमेची व अवघड शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापासून दाखल या तरुणाचे कोणीही नातेवाईक नसताना जिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्याचा संभाळ करण्यात आला. रोहीत हा खंडवा येथील रहिवासी असून तो रेल्वे अथवा स्थानकांवर शेंगदाणे विक्री करून वडिलांना मदत करीत असतो. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात 20 ऑगस्ट रोजी भुसावळ स्थानकावर शेंगदाणे विक्री करीत असताना तेथे विक्रेत्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की, यात रोहीतच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. यामध्ये त्याच्या पोटातील आतडे फाटले गेले व पोटात खोलवर जबर जखमा झाल्या. त्या वेळी रेल्वे पोलिसांनी त्याला अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

प्रकृती खालावलीज्यावेळी रोहीतला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्या वेळी त्याची प्रकृती खालावलेली होती. मात्र रुग्णालयाच्यावतीने त्याला तशाही अवस्थेत दाखल करून घेण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नसताना रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी या तरुणावर अत्यंत जोखमेची व अवघड शस्त्रक्रिया केली आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. 

रोहीतच्या आईचे निधन झालेले असून घरात वडील व एक भाऊ असेच कुटुंब आहे. महिनाभरापासून रोहीत जिल्हा रुग्णालयात दाखल असला तरी मध्यंतरी केवळ दोन दिवस त्याचा भाऊ येथे आला, मात्र वडिलांकडेही कोणी लक्ष देणारे नसल्याचे सांगून तो परत गेला. त्यामुळे त्याच्याजवळ कोणीच नसताना जिल्हा रुग्णलायात डॉ. किरण पाटील यांच्यासह आपत्कालीन कक्ष, शस्त्रक्रिया विभागातील परिचारिका, कर्मचारी आणि प्रमोद झवर यांनी या तरुणाची देखभाल करीत त्याचा संभाळ केला. 

महिनाभरात या तरुणाच्या प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा झाली असून तो ठणठणीत झाला आहे. आता तो स्वत: चालू-फिरू शकत असून त्याला लवकरच रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.