शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन - प्रा.डॉ.किसन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:56 IST

समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देव्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन'सातपुडा' वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

रावेर, जि.जळगाव : महाविद्यालयीन जीवनात वाङ्मय मंडळ हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम असून, लेखकाच्या अनुभूतीतूनच साहित्य आकाराला येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी या निरक्षर असताना त्यांच्या नावाने विद्यापीठ नावारूपाला येणे ही अनन्यसाधारण बाब आहे. समाजाला दिशा देणारे साहित्य हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील यांनी केले.व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही. दलाल होते. प्रारंभी महाविद्यालयाच्या 'सातपुडा' या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.किसन पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल राधा मनोहर पाटील व लीना प्रवीणकुमार मानकरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .प्रमुख पाहुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.डॉ.ए.जी.पाटील म्हणाले, साहित्य, समाज आणि संस्कृतीचा अभ्यास महत्त्वाचा असून समाजाची अभिरुची साहित्याच्या स्वरूपामुळे लक्षात येते. समाज जीवनाचे चित्रण साहित्य करते .प्रास्ताविक प्रा ढोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी. धापसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.एस.बी. गव्हाड यांनी केले. स्वागत गीत लीना मानकरे हिने म्हटले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.डॉ.जे.एम.पाटील, प्रा.एम.एस.पाटील, प्रा.डॉ.एस.जी.चिंचोरे उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यRaverरावेर