जळगाव : ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ हा चित्रपटातील संवाद जिल्हा पोलीस दलात वारंवार ऐकाला मिळत आहे. वाहतूक शाखेतील एका कर्मचा:याची या दोन बायकांमुळे चांगलीच फजिती होत आहे. गुरुवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या दालनाच्या बाहेर दुस:या प} ीने पोलीस कर्मचा:याला कॉलर धरुन मारहाण केल्याचा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक कार्यालयात दिवसभर या प्रकाराची जोरदार चर्चा होती. वाहतूक शाखेत असलेल्या एका कर्मचा:याला दोन बायका आहेत. त्याच्यापासून दोघींना मोठी मुले आहेत. दोन बायकांमुळे सतत वाद होत असल्याने या कर्मचा:याने दुस:या बायकोला शेगाव येथे भाडय़ाने खोली घेवून राहण्याची व्यवस्था करुन दिली आहे. तेथे ती मुलासह राहते तर पहिल्या बायकोसोबत हा कर्मचारी जळगावातच राहतो. गेल्या सहा महिन्यापासून पतीने घर भाडे व खर्चासाठी पैसेच दिले नसल्याने संतापलेली शेगावहून बायकोने जळगाव गाठले.गुरुवारी दुसरी बायको तिच्या मुलीला घेवून पोलीस अधीक्षक कार्यालयात आली होती. तेथे तो कर्मचारी व त्याची पहिली बायकोही होती. तेथेच दुस:या बायकोने पतीला मारहाण करायला सुरुवात केली.
पोलिसाच्या दोन बायका अन् फजिती ऐका
By admin | Updated: October 9, 2015 01:14 IST