शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अध्ययनातून भाषिक क्षमतांचा विकास व्हावा -डॉ.जगदीश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:09 IST

माय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे वेबिनार मंगळवारी पार पडला.

ठळक मुद्देमाय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे वेबिनार पार पडला. दीड हजार शिक्षकांनी घेतला सहभाग

भुसावळ, जि.जळगाव : पाठ्यपुस्तकातील पाठ शिकण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भाषा वापराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्यास अध्ययन सुलभ होण्यास मदत होते. शिक्षकांनी सर्जनशीलता, कल्पकता व शोधक वृत्तीने भाषिक कृतींची रचना केल्यास आणि विद्यार्थ्यांना करायला लावल्यास पाठ शिकण्याची मजा येईल आणि त्यातूनच भाषिक क्षमतांचा विकास होऊन खऱ्या अर्थाने भाषा शिकण्याचा आनंद मिळेल, असे प्रतिपादन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.पुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे आयोजित वेबिनार पाठात सुमारे दीड हजार शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रारंभी संघाचे मार्गदर्शक हनुमंत कुबडे अण्णा यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा देशपांडे यांनी डॉ. पाटील यांचा परिचय करून दिला. पुणे जिल्हाध्यक्ष यशवंत बेंद्रे, सचिव अशोक तकटे, संजय गवांदे, सारंग पाटील, ज्ञानदेव दहिफळे, डॉ. प्रिया निघोजकर, मुरलीधर भुतडा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जगदीश पाटील यांनी इयत्ता दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी या पाठाचे क्षमतांवर आधारित अध्ययन पाठ या अनुषंगाने पीपीटीद्वारे सविस्तर सादरीकरण केले. सुरूवातीला त्यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमासंदर्भात सांगून अभ्यासक्रम व मूल्यमापन या दोघांमध्ये अध्ययन-अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकातून क्षमता विकसित कशा होतील यासाठी भाषा शिक्षकांनी भर देणे गरजेचे आहे. अध्यापनाकडून अध्ययनाकडे वाटचाल करताना पारंपारिकतेसोबत आधुनिकता देखील जोपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. इझीटेस्ट व झूमच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमधील या पाठाच्या सादरीकरणाला संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार शिक्षक ऑनलाईन सहभागी झाले होते. माय मराठी महाराष्ट्र संवादतर्फे आयोजित वेबिनार पाठात पहिलाच पाठ सादर करण्याची संधी जळगाव जिल्ह्याला म्हणजेच डॉ. जगदीश पाटील यांना मिळाली. पाठ सादरीकरणानंतर अनेकांनी प्रत्यक्ष बोलून व चॅटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्यांना या ऑनलाईन सादरीकरणाचा लाभ घेता आला नाही त्यांना इझीटेस्ट ॲपवर हे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुरलीधर भुतडा यांनी सांगितले. सूत्रसंचालन सारंग पाटील यांनी तर आभार डॉ. प्रिया निघोजकर यांनी मानले.

टॅग्स :marathiमराठीBhusawalभुसावळ