शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

जळगाव येथे बालिकेवर बलात्कार करणा-यास जन्मठेप, 17 महिन्यानंतर पीडितेला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:56 IST

12 हजार रुपयांची रक्कम  पीडित मुलीस देण्याचे आदेश

ठळक मुद्दे12 जणांची घेतली साक्षआजन्म कारावासासह  15 हजार रुपयांचा दंड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13-  मेहरुण परिसरातील भिलाटी भागात 16 जुलै 2016 रोजी रात्री एका वृध्देच्या घरात घुसुन तिच्या दहावर्षाच्या अल्पवयीन नातीवर अत्याचार करणा:या  राजू रमेश निकम (उर्फ कैलास आसरु बनकर) यास शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावास तसेच पंधरा हजार दंड अशी शिक्षा सुनावली. यामुळे गेल्या 17 महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या पीडितेला अखेर न्याय मिळाला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता.   12 जणांची घेतली साक्षया घटनेप्रकरणी न्यायालयाने 12 जणांच्या साक्षी घेण्यात आल्या. या घटनेचे मुख्य तपासाधिकारी सुनील कु-हाडे, पीडितेच्या वयाची व तीच्या आरोग्याची तपासणी करणारे डॉक्टर,  आरोपीची तपासणी करणारे डॉक्टर, स्वत: पीडिता यांच्यासह  पोलीस निरीक्षक सुजाता  राजपूत , महिला दक्षता समितीच्या शरीफा तडवी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तर संपूर्ण खटल्यावेळी पीडित मुलीला मानसिक आधार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव व मोनाली काळसकर यांनी दिला.पीडित मुलीची आई ती 5 वर्षाची असताना वारली, आईच्या मृत्यूनंतर वडील देखील तीला वृध्द आजी व दोन लहान भावांसह सोडून घरातून निघुन गेले आहेत. त्यामुळे अंध-कर्णबधीर असलेल्या आजी व लहान भावांसाठी पिडीत मुलगी एकमेव आधार आहे. आजन्म कारावासासह  15 हजार रुपयांचा दंड राजु रमेश निकम (उर्फ कैलास आसरु बनकर) याला भादंवी कलम 376 (21)(1) या कलमाखाली  जन्मठेप तसेच 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद, तर भादंवी कलम 450 खाली 5 वषार्र्ची कैद व 5 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी कैद अशी  शिक्षा जिल्हासत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी सुनावली.  15 हजार रुपयांच्या दंडामधून 12 हजार रुपयांची रक्कम  पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले. तसेच शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पिडीत मुलीस मदत देण्यात यावी अशी सूचना देखील केली. सरकारी पक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.