शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

By विजय.सैतवाल | Updated: July 12, 2023 20:06 IST

भाजीपाला व्यवसायातून वाढली होती जवळीक

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : भाजीपाला व्यवसायातून जवळीक वाढून अनैतिक संबंध निर्माण झाले व वाद होऊन महिलेचा खून केल्याप्रकरणी सुरेश सुकलाल महाजन (५५, रा. रामेश्वर कॉलनी) याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुरेश सुकलाल महाजन हा भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा. हाच व्यवसाय करणाऱ्या वंदना गोरख पाटील या महिलेचादेखील होता. यातून दोघांमध्ये ओळख होऊन घरोब्याचे संबंध निर्माण झाले आणि त्याचे रुपांतर अनैतिक संबंधात झाले. त्यामुळे आरोपीचे महिला राहत असलेल्या  तुळजामाता नगरातील घरी येणे-जाणे वाढले.  

महिला एकटीच असल्याने वाढले येणे-जाणे 

महिलेच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे महिला व तिचा मुलगा दीपक हे दोघेच घरी राहत होते. मुलाचे लग्न झाल्यानंतर तो पत्नीसोबत उदगीर येथे नोकरी निमित्ताने निघून गेला. त्यामुळे मयत ही घरात एकटीच राहत होती आणि आरोपी नेहमी तिच्या घरी येत असे. 

वजन मापे, चाकू व ओढणीचा खुनासाठी वापर

२६ ऑगस्ट २०२१च्या रात्री याच परिसरात राहणारे रामलाल पवार यांच्याकडे दोघांनी ठेवलेले पैसे घेण्यासाठी महिला व सुरेश महाजन हे  गेले. दोघेही जण पैसे घेऊन निघून गेले. त्याच रात्री महिलेच्या घरी  महाजन याने अर्धा किलो वजनाच्या मापाने, चाकू तसेच ओढणीच्या सहायाने गळफास देत महिलेचा खून केला होता. या प्रकरणी महाजनविरुद्ध कलम ३०२नुसार गुन्हा दाखल झाला. 

या प्रकरणी न्यायालयात कामकाज झाले. यात मयताचा मुलगा दीपक,  साक्षीदार रामलाल पवार, वैद्यकीय अधिकारी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. मयताचा मुलाने   आरोपी व त्याची मयत आई वंदना हे बऱ्याच वर्षापासून पती-पत्नी सारखे राहत होते, असे जबाबात सांगितले. विशेष म्हणजे आरोपी व मयत रात्री सोबत असल्याने महिलेच्या अंगावरील जखमा कशाच्या व कशामुळे झाल्या व महिला कशामुळे मयत झाली, याचे स्पष्टीकरण देऊ शकला नाही.  त्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले. 

जिल्हा न्यायाधीश-१  एस.एस. सापटणेकर यांनी महाजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भा.द.वि. कलम ३०२ अन्वये आजन्म सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास असा आदेश दिला.  सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालय