शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याला फुटावे आनंदाचे पाय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 11:11 IST

पाटणादेवी परिसराची सहलवारी: दिव्यांग भगिनींनी अनुभवली निसर्ग मौज..

ठळक मुद्दे तहसिलदारांनी केले आयोजन 22 दिव्यांग भगिनींसह प्रांताधिकारी सहभागी

चाळीसगाव: दि. 18  आयुष्याला जणू आनंदाचे पाय फुटावे..इवल्या इवल्या गवताच्या गालिच्यावरुन बेभान होत पळावे..थेट पानाफुलांची गळाभेट व्हावी..कोसळणा:या सरींमध्ये चिंब भिजावं..त्यांच्या चेह-यावर उत्साहाचे असे उधाण होते. आपण दिव्यांग आहोत ही वेदनाच त्या विसरुन गेल्या होत्या. स्वयंदीप दिव्यांग परिवारातील 22 दिव्यांग भगिनींनी पाटणादेवी परिसराची सहलवारी करतांना निसर्गाचा आनंद लुटला. मौजमस्तीचे चार सुखद क्षणही अनुभवले. मंगळवारी  चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे यांनी ही निसर्ग सफर त्यांच्यासाठी आयोजित केली होती. प्रांताधिकारी शरद पवार, स्वयंदीपच्या मिनाक्षी निकम, सर्पमित्र राजेश ठोंबरे आदी उपस्थित होते. दरदिवशी उपेक्षेचे जिणे, चार भिंतीच्या आड ढकलेलं जीवन अनुभवणा:या दिव्यांग व्यक्तिंची सहलवारी म्हणजे स्वप्नवत गोष्ट. मात्र स्वयंदीप परिवारात आपल्यातील दिव्यांग बाजूला सारत स्वत:च्या पायावार उभ्या राहू पाहणा:या 22 भगिनींना निसर्गातील मोकळा श्वास घेण्याची संधी मिनाक्षी निकम यांच्या प्रय}ातून मिळाली.  आज मै आगे..जमाना है पिछेपाटणादेवी परिसरातील  हत्ती बंगला येथे दिव्यांग भगिनींनी वनभोजनाची चवही अनुभवली. पिसारा फुलवित थुई..थुई नाचणारे मोर, माकडांची टोळी, अधुन-मधुन निनादणारी पाखरांची मंजुळ गाणी, उंच डोंगर कडय़ांवरुन कोसळणारे मनोहारी झरे आणि या मैफलीत हलकेच येणा:या पाऊस सरी.. आज मै ऊपर, आसमाँ निचे..आज मै आगे, जमाने है पिछे असे काहीसे आगळे-वेगळे क्षण या भगिनींच्या वाटय़ाला आले. वन्यजीव विभागाचे एन.बी. पटर्वधन, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, उज्वला ठोंबरे, महसूल विभागातील कर्मचा:यांनीही सहपरिवार ही सहलवारी एन्जॉय केली.