शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेशनास नांगर पूजनाने थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 12:18 IST

आपणच करुया आपला उद्धार..

ठळक मुद्देलोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशनलेझीम पथकाने  स्वागत

रवींद्र मोराणकर / ऑनलाईन लोकमत

पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - कृषी क्षेत्रातून प्रगती साधत शिक्षणाची कास धरून प्रगती साधलेल्या लेवा पाटील समाजाच्या  राष्ट्रीय महाअधिवेशनास शेतक:यांचे प्रतीक असलेल्या नांगर पूजनाने रविवारी सकाळी  पाडळसे, ता. यावल येथे थाटात प्रारंभ झाला. या अधिवेशनासाठी राज्यभरातून समाजबांधव उपस्थित आहेत.भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी रविवार सकाळपासूनच अधिवेशस्थळी समाज बांधव येण्यास सुरुवात झाली. तरुणींच्या तालबद्ध लेझीम पथकाने  स्वागत होऊन वारकरी संप्रदाय परंपरेनुसार भजनी मंडळाच्या दिंडीच्या गजरात  मान्यवरांना व्यासपीठावर  आणण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कुटुंब नायक रमेश विठू पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे,  खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे,  जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे,  जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार रमेश चौधरी,  महाअधिवेशन समितीचे अध्यक्ष विष्णू भगाळे,  शिरीष चौधरी,  शामल सरोदे, मंदा खडसे  आदी  उपस्थित होते. 

आपणच करुया आपला उद्धार..प्रगतीशील शेतकरी नारायण चौधरी व भारती चौधरी यांच्याहस्ते नांगर पूजन  करण्यात येऊन अधिवेशनास सुरुवात झाली तसेच कुटुंबनायक रमेश विठू पाटील, एकनाथराव खडसे तसेच तरुणींच्याहस्ते  दीपप्रज्वालन करण्यात येऊन अधिवेशनास सुरुवात झाली. 1984 मध्ये झालेल्या अधिवेशनात सादर झालेल्या आपणच करुया आपला उद्धार..  हेच गीत याही अधिवेशनात सादर करण्यात येऊन प्रारंभ झाला. प्रास्ताविक विष्णू भंगाळे यांनी केले. 

लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशनया अधिवेशनानिमित्त लोकमतने काढलेल्या चार पानी विशेष पुरवणीचे अधिवेशस्थळी मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.