शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबाईस पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 01:23 IST

प्रिय आई, बहिणाबाई चौधरी. (होय, आईच गं तू माझी. आई मुलाला जन्म देते आणि संस्कार करते. तसाच तुझ्या कवितेच्या प्रेरणेने माझ्या कवितेचा जन्म झाला आणि वास्तवाची जाणीवही झाली म्हणून तूच खरी माझ्या कवितेची आणि माझीही आई झालीस.) ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील मराठी विषयाच्या अध्यापक प्रा.संध्या महाजन...

प्रिय आई ,सादर प्रणाम.‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव’ असं तुझं नाव आपल्या लाडक्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठानं अभिमानानं त्याच्या माथ्यावर सुवर्ण अक्षरात कोरलयं बघ. कसं दिमाखात अमर केलंय तुझ्या कवितेला त्यानं, पण तेवढं सामर्थ्यही तुझ्या त्या गोड ग्रामीण लेवागण बोलीतून जीवनाचे सार सांगणाऱ्या कवितेत समावलेलं आहे म्हणूनच हे सारं शक्य झालंय.लेवागण बोलीची पताका तुझ्या कवितेनं आसमंती फडकवली आणि आपल्या बोलीला संजीवनी देणारी अमृतवाहिनीच बनली गं.एका निरक्षर महिलेचं नाव विद्येच्या माहेर घराला दिलं गेलं हे ऐकल्यावरच तुझ्या कवितेत असं काय असावं, अशी उत्सुकता जागी होते आणि आपसूकच तुझं पुस्तक हाती घेऊन ते वाचल जातं आणि एकदा का हे पुस्तक हातात पडलं की वाचक त्याच्या अक्षरश: प्रेमात पडतो बघ. अधाशासारख्या एक-एक कविता वाचून झाल्यावरच भानावर येतो.आणि हो नुसत्याच वाचत नाही तर आपोआपच तालासुरात वाचतो एवढं सामर्थ्य आहे या कवितांमध्ये.इतकी अफाट निरीक्षण शक्ती कुठून आली तुझ्याठायी हे जणू एक कोडंच बनलंय आजकालच्या समीक्षकांसाठी.अगदी छोटाशा चिमणीच्या खोप्यापासून, बी-बियाण्यापासून नांगरणी, वखरणी, विविध सण उत्सव, माणसांचे नानाढंगी स्वभावधर्म... काही... म्हणता काहीच सुटलं नाही तुझ्या कवितेतून. बी-बियाणं पेरल्यानंतर त्यावरील मातीला‘वºहे पसरली माटीजशी शाल पांघरली’अशी कल्पना फक्त तूच करू जाणे गं बाई...तुला सांगू तुझ्या त्या-सोन्यारूप्यानं मढलामारवाड्याचा बालाजीशेतकºयाचा विठोबापानाफुला मंधी राजीया कवितेचा भोळाभाव किती मोठ तत्त्वज्ञान सांगतो मानवाला.संसाराचे रखरखते चटके खातानासुद्धा कोणतीही तक्रार न करता‘अरे संसार संसारजसा तावा चुल्ह्यावरआधी हाताले चटकेतव्हा मियते भाकर’असंच म्हणत तू सहनशीलतेची पराकाष्टा शिकवलीस. प्रत्येक संसारी स्त्रीसाठी जगण्याची नवी प्रेरणाच तू प्रत्येक कवितेतून स्त्री सुलभ मनात पेरत गेलीस.अगदी कमी वयात वैधव्य येऊनही तू खंबीरपणे लेकरापाठी उभी राहिलीस कपाळीचं कुंकू पुसलं गेलं, अहेवचुडा फुटला तरी तू तुझ्या डोळ्यासमोर दोन लाल उभे राहिलेत‘राहो दोन लाल सुखी, हेच देवाले मागनंत्यात आलं रे नशीब, काय सांगे पंचांगन,नको नको रे जोतिषा नको माह्या हात पाहूमाह्य दैव कये मले नको माह्या दारी येऊकेवढं तुझं हे आत्मभान’अगं, स्वत:च्या लेकरावर तर प्रत्येक आई माया करतेच, पण तू म्हणजे मात्र अजबच रसायन.सासूवर, देराणी-जेठाणीवर नणंदेवरच नव्हे गोठ्यातल्या जनावरावरसुद्धा तू तितकंच प्रेम उधळलंस.‘त्या भाकड गायीवरची माया तूमाझ्या कपिलेची पाठजशी माहेराची वाटअशी व्यक्त केलीस.’एवढंच काय देराणीसोबत माहेरी जाताना दगडाची ठेच लागल्यावर तुला त्यातूनही आवाज आला...‘नीट जाय मायबाई नको करू धडपडतुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगडकिती प्रेमानं, ममतेनं भरलेलं हृदय मिळालं होतं तुला.तुला सांगू मला तुझ्या त्या योगी आणि सासुरवाशीण मधल्या त्यादे रे योग्या दूरे ध्यानऐक काय मी सांगतेलेकीच्या माहेरासाठीमाय सासरी नांदतेया ओळी अगदी हृदयाच्या जवळच्या वाटतात. तू त्या काळातही मुलीच्या जन्माविषयी आस्था दाखवलीस. तू त्या योग्याला सांगतेस,‘अरे लागले डोहायेसांगे शेतातली माटीगानं गाते माहेराचलेक येईन रे पोटी’आणिआई आणि बाबांबद्दल तू म्हटलेल्या दोन दोनच ओळीत केवढं प्रेम आणि आदर दर्शवलास तू.आई आणि आत्या (सासू)माय म्हनता म्हनताहोट होटालागी जुळेआत्या म्हनता म्हनताकेवढ अंतर ते पडेबाबा आणि काकाताता म्हनता म्हनतादातामधी जीभ अडेकाका म्हनता म्हनताकशी मांघे मांघे दडेएखाद्या भाषाशास्त्र शिकवणाºया अध्यापकाप्रमाणे सूक्ष्म निरीक्षण केलेस उच्चारण स्थानांचे...अग, फक्त मायेची माणसंच नव्हे तर अगदी दारी येणारा, भिक्षुकी करणारा बहुरूपीसुध्दा तुझी कविता फुलवतोय. रायरंग म्हणायचे, त्याला गावातील लोक तेव्हा त्याला हिणवतही असतं. पण तू मात्र त्याच्याबद्दल सांगतेस अरे हिणवू नका. त्याला तो थकल्या भागल्याची कष्टकºयाची करमणूकच करतो, भिक्षा नाही मागत, बघा त्याच्याकडे.‘कोन्ही म्हने आलं दारीरायरंगाचं रे सोंगअरे त्याच्या सोंगामधीमाले दिसे पांडुरंग’त्याच्यातसुद्धा तू पांडुरंग पाहिलास धन्य आहेस गं बाई तू.तुझ्या गावाचं तू केलेलं वर्णन तर केवळ अप्रतिम... राममंदिरापासून ते बौद्धवाड्यापर्यंतचा तो प्रवास, अगदी तंतोतंत गाव डोळ्यासमोर उभा केलास.संसाराच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवताना तुझ्या मिश्कील स्वभावाचे दर्शन होते ओली लाकडं ओली आगपेटी यामुळे चूल पेटत नव्हती तर तुझं गाणं झालं सुरू...‘पेट पेट धुक्कयेलाकिती घेशी माझा जीवअरे इस्तवाच्या धन्याकसं तुले आल हीव...’अगं कुठून आणत होतीस एवढा शब्दभरणा... स्वत: अशिक्षित असून तुझं पुस्तक आज कित्येक लोकांना शिक्षित करतंय. कितीतरी प्राध्यापक पीएच. डी. झालेत तुज्या एवढ्याशा कवितांवर. भाषा अध्ययन केंद्रावर संशोधन होतंय तुझ्या कवितेवर.‘मस्तकात पुस्तकात गेलंपुस्तकातलं मस्तकात आलं’म्हणत तू काव्यगायन करत होतीस. तेही कोणत्याही पुस्तकातलं न वाचता न लिहिता.तुझ्या कवितेने कितीतरी ‘कोरे कागद शहाणे’ केले गं...‘मानवाच्या अति चंचल मनाला तूमन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरंकिती हाकला हाकला फिरी येई पिकावर’अशी ढोराची उपमा दिलीस...आणखी महत्त्वाचं सांगू तुझ्या याच लेवागण बोलातील कवितांनी समाजभाषेला नवसंजीवनी तर दिलीच पण भाषा समृद्धीचेही वरदान देऊन उपकृत केलं आहे .अनंत उपकार तुझ्या एकमेवद्वितीय काव्यसंग्रहाने समाजभाषेवर केले आहेत.किती लिहू ग माऊली तुझ्या कवितेवर कधी संपणारच नाही.एक विनंती आहे माझी...तुझ्या त्या सरोसती आईला ज्या आईने तुझ्या मनात इतकी गुपितं पेरलीत तिला माझ्या कवितेवरही थोडी कृपादृष्टी ठेवायला सांग ना...‘तुझ्या कवितेचे बाळकडू पिऊन माझीही कविता समृद्ध होऊ दे.एवढा आशीष तुझा असू दे माझ्या कवितेवर.’तुझ्या कृपेची अभिलाषीतुझी एक लेक...

प्रा.संध्या महाजन, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव