शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बोरांच्या रूपाने असलेली ओळख मेहरुणला पुन्हा मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत चालली आहे. मेहरुणच्या ‘त्या’ बोरांची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केला.

रविवारी ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे संपूर्ण शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर साकारल्या जात असलेल्या फळबाग व रानमेवा प्रकल्पाचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रकल्पांतर्गत मेहरुण परिसरात ५०० फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे. यावेळी माजी आमदार मनीष जैन, जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, विनोद चौधरी, पारस टाटिया, बंटी बुटवानी, आनंद मराठे, प्रकल्पप्रमुख विजयकुमार वाणी, ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, सतीश रावेरकर, अनुराधा रावेरकर आदी उपस्थित होते.

काय आहे प्रकल्प

१. मेहरुण तलावाच्या काठावर ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे फळबाग व रानमेवा प्रकल्प साकारला जात आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात ५०० फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सीताफळ, रामफळ, जगप्रसिद्ध मेहरुणची बोरे, तसेच महाबळेश्वरची मलबेरी (सैतू), नाशिकचे करवंद व बर्‍हाणपूरची गोड खिरणी अशा रानमेव्याची लागवड केली जाईल.

२. हा प्रकल्प लोकसहभागातून साकारला जात असून, पाच वर्षे या रोपांची जोपासना ‘मराठी प्रतिष्ठान’ करेल. साधारणपणे दुसर्‍या वर्षापासून काही झाडांना फळधारणा होईल. त्यांच्या लागवडीसाठी पाचशे खड्डे खोदले जाऊन, त्यात कीटकनाशक, जैविकखत टाकले गेल्यानंतर रोपांची लागवड होईल. या प्रकल्पात वृक्ष दत्तक योजनाही असून, नागरिकांना यात सहभाग नोंदविता येईल, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.