शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘रमाई घरकुल’कडे लाभार्र्थींची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:24 IST

अडीच लाखांसाठी ५ ते १० लाखांच्या मालमत्तेवर लाभार्र्थींच्या उताऱ्यावर बोझा

अमळनेर, जि.जळगाव : अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या रमाई घरकुल योजनेच्या जाचक अटींमुळे लाभार्थी मिळत नसल्याने निधी परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही योजना बारगळण्याची शक्यता असून शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे.अनुसूचित जाती म्हणजे एस.सी. प्रवर्गासाठी शासनाने घरकुल बांधण्यासाठी रमाई घरकुल योजनेंतर्गत आधी दीड लाख, नंतर अडीच लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्यासाठी नागरिकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत असले पाहिज. तसेच त्याची किमान ३०० ते ५०० स्केअर फूट जागा स्वत:च्या मालकीची असावी. त्याने आधी कोणताही लाभ घेतलेला नसावा, मात्र अनुदान घेणाºया लाभार्थीला मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र करून घ्यायचे आहे, त्याला ते घर विकता येणार नाही व त्याला कर्जही मिळणार नाही. म्हणजेच भविष्यात त्याला मुलामुलींच्या लग्नासाठी किंवा सुख-दु:खात तसेच इतर कामांसाठी त्यावर त्याला बँक कर्जही देणार नाही. कारण शासन त्याला अडीच लाख देत आहे अन् उर्वरित रक्कम त्याने टाकून घर बांधकाम करून त्याची मालमत्ता सुमारे पाच लाखांपासून पुढे जाते. त्यावर शासन त्याच्या उताºयावर बोझा लावून घेते. म्हणजे त्याच्या घरकुलावर शासनाचा बोझा लागतो. त्यामुळे त्याला कर्ज मिळत नाही. मुद्रांकावर घरकुल न विकण्याचे प्रतिज्ञापत्र शासन बनवून घेते तर उताºयावर बोझा लावण्याची गरजच काय? त्यामुळे ‘शासन अनुदान देते आहे की कर्ज’ घरावर बोझा लावून तर बँकही कर्ज देते, असाही प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत.म्हणून लाभार्र्थींनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. अमळनेर पालिकेकडे प्रथम ९३ घरकुलांसाठी सुमारे एक कोटीवर निधी आलेला आहे, पैकी २८ घरकुले पूर्ण बांधली आहेत, तर १९ प्रगतीपथावर आहेत. बाकीचे लाभार्थी मिळत नाहीत. पालिकेने वारंवार जाहिरात देऊनही रमाई घरकुल योजनेकडे पाठ फिरवण्यात आली आहे.अमळनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. त्याउलट पंतप्रधान आवास योजनेत जाचक अटी नसल्याने नागरिक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पंतप्रधान आवास योजनेतही तेवढे अनुदान मिळणार असल्याने मालमत्तेवर निर्बंध नको म्हणून त्या योजनेचा लाभ नागरिकांना सुलभ वाटत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून पालिकेकडे निधी प्राप्त आहे. मात्र सिटी सर्व्हे कार्यालय अथवा तलाठ्याकडील अहस्तांतरणीय अशी नोंद मालकाने जागेच्या उताºयावर लावल्याशिवाय अखेरचा १० टक्के रकमेचा हप्ता दिला जात नाही म्हणून लाभार्र्थींमध्ये उदासीनता आहे. पालिकेने दोन-तीन वेळा जाहिराती देऊनही अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी शासनाने योजना जाहीर करूनही लाभार्थी लाभ घेण्यास तयार नाही हे आश्चर्यजनक आहे.शासनाच्या अटींना घाबरून लाभार्थी अनुदान घेण्यास तयार नाहीत. पालिकेकडे पैसे शिल्लक आहेत व अजून शासन देण्यास तयार आहे. मागासवर्गीय नागरिकांसाठी चांगली योजना आहे. - पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेरअमळनेर शहरातील नागरिकांनी रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा आलेला निधी परत जाऊ शकतो. - शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, अमळनेर