शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साकेगाव वनहद्दीत बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:33 IST

बिबट्याने गावातील भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एका मेंढीची शिकार केली आहे.

ठळक मुद्देदोन शेळ्या व एक मेंढीची शिकार शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट

भुसावळ : शहराजवळील साकेगाव फॉरेस्ट हद्दीत गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असून, बिबट्याने गावातील भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एका मेंढीची शिकार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह या भागाचा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साकेगाव पुढे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्ता व फॉरेस्ट हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून नीलगायीसह बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास येत आहे. या वन्यप्राण्यांचे ग्रामस्थांना दर्शनही झालेले आहे. गेल्या दोन दिवसात बिबट्याने गावातील शेळी मेंढीपालनचा व्यवसाय करणारे भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एक मेंढीची शिकार केली आहे. यामुळे गुरे चालणारे यांच्यासह शेतकरी व या भागात वापर करणारा मध्ये कमालीचे भीतीचे वातावरण दिसून येत आहे. 

शेती करणे झाले अवघडवन हद्दीला लागून साकेगावकरांसह जोगलखेडा भानखेडा या गावातील शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी शेतात गहू हरभरा पिकाची लागवड केलेली आहे. रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी काही शेतकरी मुक्कामी शेतात थांबतात तर काही शेतकऱ्यांना दिवसा काम आटोपून घराकडची वाट घेतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याने शेळ्या मेंढ्याची शिकार केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे, दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी पी. एम.महाजन, वनरक्षक विलास काळे, संदीप चौधरी तसेच वनसेवक विलास पाटील व तुषार भोळे या टीमने वनहद्दीत पाहणी केली.  काही प्राण्यांचे पायाचे अस्पष्ट ठसे असल्यामुळे नेमका कोणता प्राणी आहे याबाबत निकष लावणे कठीण असल्याचे वन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला  सांगितले. 

शेतक-यांनी सतर्क राहावेफॉरेस्ट शिवारामध्ये शेतीकामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावध व सतर्क रहावे. हातात काठी असावी. एकट्याने जाऊ नये. रात्रीच्या वेळेस टॉर्चचा वापर करावा. याशिवाय मोबाईलच्या गाण्याचे आवाज वाढविल्यास वन्यप्राणी जवळ येत नाही. तसेच रात्री जर शेतात मुक्काम असला तर शेकोटी करावी. आगीमुळे  वन्यप्राणी जवळ येत नाही.  यापुढे बिबट्याचे किंवा  इतर हिंस्र प्राण्याचे दर्शन झाल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे वनरक्षक विलास काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारBhusawalभुसावळ