लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - नंदिनीबाई वामनराव मुलींचे ज्युनियर महाविद्यालयात मानसिक संतुलन कसे राखावे, या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी.एस.पाटील होत्या. मानसोपचारतज्ज्ञ कांचन नारखेडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य एस.एस. नेमाडे मॅडम, डॉ. डी यू. राठोड, ज्योती कापूरे, स्वाती पाटील आदींची उपस्थिती होती.
००००००००००००००
एमबीए सीईटीसाठी मार्गदर्शन वर्ग
जळगाव - केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव आणि तारकशास्त्र ॲकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीए सीईटीचे मोफत वर्ग २४ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित ॲकॅडमिक डायरेक्टर संजय दहाड आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सुगंधी, प्रा. दिगंबर सोनावणे, प्रा. मयूर बोरसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
००००००००००००
सर्वन्य संस्थेतर्फे ‘धर्माचा धागा’ उपक्रम
जळगाव- रक्षाबंधनाच्या पावन मुहूर्तावर ‘धर्माचा धागा’ हा उपक्रम सर्वन्य बहूद्देशीय संस्थेकडून राबविण्यात आला. यावेळी संस्थेच्या सुचित्रा महाजन, देवेंद्र भावसार, राजू नन्नवरे, दीपक दाभाडे, नितीन काबरा, वामन महाजन आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
०००००००००००००००
पटनी स्कूल येथे चित्रकला स्पर्धा
जळगाव - पाळधी येथील मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी किल्ले आणि ऐतिहासिक इमारतींचे चित्र रेखाटले. सुरुवातीला शाह सईद व मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.