फैजपूर, ता. यावल : महिला बचत गटांना भविष्यात पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आमदार शिरीष चौधरी यांनी ग्वाही देत महिला बचत गट निर्मित 'सरस्वती वस्तू भांडार' च्या दालनाचा शुभारंभ केला
सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र पालतर्फे या बचत गटांना येथील औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालयासमोर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आमदार चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांनी मतदारसंघातील महिलांसाठी हे प्राथमिक स्वरूपात उचललेले पाऊल आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, बचत गट सदस्या जोत्स्ना महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महेश महाजन व धीरज नेहते यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले, जि.प.सदस्या सुरेखा पाटील, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, उपाध्यक्ष अशोक झांबरे, पालच्या सरपंच हजरा तडवी, प्राचार्या डॉ.अरुणा चौधरी, जे. के. पाटील, शेतकी संघाध्यक्ष पी.आर. पाटील, प्रल्हाद बोंडे, माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, कलीम मन्यार, रघुनाथ कुंभार, वसीम तडवी, शेख रियाज, लीलाधर चौधरी, एस. के. चौधरी, माजी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, अनिल लढे, प्राचार्य व्ही. आर. पाटील यांच्यासह महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होत्या.