शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे शेतकरी संघात हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:53 IST

यावल, जि.जळगाव : तालुका शेतकरी संघात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासकीय हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ १ ...

ठळक मुद्दे२१ नोव्हेंबरपर्यंत ३८२ शेतकऱ्यांनी केली आॅनलाईन नोंदणी८०० एकरमधील ज्वारी, ११७ एकर क्षेत्रातील मका खरेदी होण्याचा अंदाजज्वारी खरेदीचा शासकीय हमी भाव प्रतिक्विंटल दोन हजार चारशे तीस रुपये, मका प्रति क्विंटल एक हजार ७०० रुपये दराने खरेदी केला जाणार

यावल, जि.जळगाव : तालुका शेतकरी संघात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासकीय हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ १ रोजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.शासकीय हमी भावात धान्य खरेदी शुभारंभाप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी तालुक्यातील सिरसाड येथील शेतकरी पंढरीनाथ इच्छाराम भिरुड यांची ज्वारी प्रतिक्विंटल दोन हजार चारशे तीस रुपये दराने शासकीय हमी भावात खरेदी केली. यासोबत राकेश वसंत फेगडे, विजय रामदास फेगडे, शशिकला वसंत फेगडे (रा.कोरपावली) व स्वप्नील शिवाजी मराठे (रा.शिरसाड) या पाच जणांची अनुक्रमे ज्वारी खरेदी करण्यात आली. २१ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३८२ शेतकºयांनी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत आॅनलाईन नोंदणी केली आहे. यात अंदाजे ८०० एकरमधील ज्वारी, ११७ एकर क्षेत्रातील मका खरेदी होणार असल्याचा अंदाज आहे, ज्वारी खरेदीचा शासकीय हमी भाव प्रतिक्विंटल दोन हजार चारशे तीस रुपये, मका प्रति क्विंटल एक हजार ७०० रुपये दराने खरेदी केला जाणार आहे. ज्वारी मका खरेदी करताना चांगल्या प्रतीच्या धान्याला प्राधान्य मिळणार आहे.उद्घाटनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कांचन फालक, सभापती भानुदास चोपडे, संचालक मुन्ना उर्फ तुषार पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश गिरधर नेहेते, माजी संचालक प्रशांत लीलाधर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नितीन चौधरी, शेतकी संघाचे संचालक तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, शेतकी संघाचे मॅनेजर गाजरे, शेतकी संघाचे संचालक नरेंद्र विष्णू नारखेडे, कोरपावली विकासो चेअरमन राकेश फेगडे, गोपालसिंग पाटील, वसंतराव भोसले, विलास पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह ग्रेडर राजेंद्र महाजन, तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.