शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात अखेर ज्वारी-मका खरेदी केंद्राचे काटा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:18 IST

भुसावळ येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व शेतकी संघ यांना केली आहे. जामनेर रोडवरील कुºहे (पानाचे)-चोरवड दरम्यान खासगी गोदामांमध्ये आमदार सावकारे यांच्या हस्ते शुक्रवारी काटा पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देखरेदीस मात्र सोमवारपासून सुरुवात होणारतीन-चार काटे लावून करावी खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

भुसावळ, जि.जळगाव : येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व शेतकी संघ यांना केली आहे.जामनेर रोडवरील कुºहे (पानाचे)-चोरवड दरम्यान खासगी गोदामांमध्ये आमदार सावकारे यांच्या हस्ते शुक्रवारी काटा पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रवींद्र पाटील हे होते, तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शेतकी संघाचे सभापती पंढरीनाथ पाटील, उपसभापती गोविंदा ढोले, सामाजिक न्याय विभागाचे मानकरी, गजानन सरोदे, होमा पाचपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू जोशी, नारायण सपकाळे, प्रशांत निकम, अशोक पाटील, अशोक सरोदे, एस.आर.पाटील, श्रीधर महाजन, सुरेश येवले , कुºहे (पानाचे) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य नाना पवार, माजी सदस्य सुभाष पाटील, किशोर वराडे, विलास देवकर, कैलास गव्हाणे, शेतकी संघाचे व्यवस्थापक विजय झोपे, ग्रेडर बोंडे, चोरवड येथील पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी -अ‍ॅड. पाटीलज्वारी व मका नोंदणी व खरेदी करण्यासाठी अवघे १५ दिवस राहिले आहे, तर आतापर्यंत ३०० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कमी काळात शेतकºयांना नोंदणी व खरेदीसाठी वेळ देण्यात यावा. खरेदीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पणन महासंघाचे संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी केली आहे व मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवा, अशी सूचना आमदार सावकारे यांना केली.दरम्यान, खरेदी केंद्र सुरू होण्यास खूपच उशीर झाला आहे. आता अवघे १५ दिवस खरेदी व नोंदणीसाठी उरले आहे. त्यामुळे खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पणन महासंघाचे संचालक एडवोकेट रवींद्र पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या मागणीचा विचार करूनच आमदार सावकारे यांनी मुदतवाढीसाठी तहसीलदारांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.मुदतवाढीची वाट न पाहता तीन काटे लावून खरेदी करावीदरम्यान, ज्वारी व मका खरेदी केंद्र काटा पूजन करण्यात आले असले, तरी खरेदीस मात्र सोमवार १७ पासून प्रारंभ करण्यात येऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्यासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहे. त्यात आतापर्यंत ३०० शेतकºयांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे संघाने मुदतवाढीची वाट न पाहता तीन ते चार वजन काटे लावून व कर्मचाºयांमध्ये वाढ करून ज्वारी व मका लवकरात लवकर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातूून करण्यात आली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ