शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:15 IST

धरणगाव पालिकेच्या दि.२९ रोजी होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या अर्जांच्या माघारीचा दि.१८ हा शेवटचा दिवस आहे.

ठळक मुद्दे२० उमेदवारांपैकी माघार कुणा-कुणाची?राजकीय पक्षांची सेना उमेदवाराला अपक्ष लढविण्याची "शाळा" यशस्वी होणार का?

धरणगाव, जि.जळगाव : धरणगाव पालिकेच्या दि.२९ रोजी होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या अर्जांच्या माघारीचा दि.१८ हा शेवटचा दिवस आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीसह २० उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांपैकी कोण-कोण माघार घेईल याकडे शहरवाशीयांच्या नजरा लागल्या आहेत, तर शिवसेनेच्या उमेदवाराला अपक्ष लढण्याची आॅफर आल्याची चर्चा शहरात आहे. राजकीय पक्षांची ही ‘शाळा’ यशस्वी होईल का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.धरणगाव येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी २० उमेदवारी अर्ज दाखल आहेत. दि.१८ रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पसंतीक्रमानुसार दोन-दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यात शिवसेनेतर्फे नीलेश सुरेश चौधरी, राजेंद्र महाजन, भाजपतर्फे मधुकर माळी (रोकडे), संजय महाजन, राष्ट्रवादीतर्फे नीलेश भागवत चौधरी, दीपक आनंदा वाघमारे, काँग्रेसतर्फे दीपक जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी सोयीनुसार शाळा होत असल्याची चर्चा आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पध्दतीने सोयीच्या खेळी करण्याचा प्रयत्न करीत आहे.दाखल नामनिर्देशन पत्र असे-- नीलेश भागवतचौधरी (राष्ट्रवादी), नीलेश सुरेश चौधरी (शिवसेना), मधुकर बन्सी माळी (भाजप), दीपक गोकुळ जाधव (काँग्रेस), प्रवीण रघुनाथ चौधरी, संभाजी गोविंदा धनगर, तौसिफ सलिम पटेल, गोपाल जगन्नाथ पाटील, महेंद्र सुभाष पाटील, वसंतराव शिवदास भोलाणे, महेंद्र गुलाब महाजन, सुरेखा विजय महाजन, संजय छगन महाजन, उमेश जानकीराम माळी, संजय एकनाथ माळी, मोहम्मद इशाक मोहम्मद यासीन, गुलाबराव रतन वाघ, दीपक आनंदा वाघमारे, हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसूल यांचे अर्ज दाखल आहेत. आता यापैकी किती व कोणते उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षDharangaonधरणगाव