शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘भाषेचा वावर, वापर आणि रंजक व्याप्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:46 IST

भाषेचा वावर, वापर आणि व्याप्ती कशी रंजक असते यासंदर्भात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत उदाहरणांसह खुसखुशीत लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे...

भाषेचा वावर, वापर आणि भाषिक बदल यासंदर्भात अनेक भाषा विद्वतांनी वेळावेळी अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणं आणि संशोधनं केली आहेत. मग ती भाषा प्रमाण असो वा बोली असो. या गोष्टीचा भाषेला अन् भाषा प्रेमींना फायदाच झालाय. परंतु अलीकडे काही भूभागात भाषा वापरात विशेष करून विशेषणांच्या, वाक्प्रचारांच्या बाबतीतला वापर आणि वावर बऱ्यापैकी वाढत चाललाय. ही बाब भाषिक समृद्धीसाठी स्वागतार्हच आहे. अर्थात हा बदल कोणी केला हे सांगणे अशक्यप्राय असले तरी नव्याने ते ऐकणाºयाला रंजक आणि तितकेच आकर्षकही वाटते.परवाची एक ताजी घटना, मी अमळनेर येथे मराठा महिला संघात व्याख्यानासाठी जात होतो. माझा भाचा सोबत होता. भाच्याचा पाच वर्षाचा मुलगा आमचे सोबत येण्याकरिता हट्टाला पेटला. पाय आपटायला लागला अन् भोकांडही पसरू लागला. त्याच्या या कृतीनं भाचा त्याच्या खास शैलीत मुलाला म्हटला, ‘येच्या गोया संपल्याहे येच्याकडे पहानं पडीन’ ‘गोया संपल्या म्हणजे नेमकं काय’ हा प्रतिप्रश्न मी भाच्याला केला. एवढ्या संतापातही भाचा हसून म्हणाला, यापूर्वी दिलेला चोप विसरलाय, नव्याने द्यावा लागले. नव्याने वाक्प्रचाराची बोलीभाषेत होणारी ही रुजवात मला अवाक करीत लिहितं करून गेली.या प्रसंगामुळे मागे केव्हा तरी ऐकलेलं भांडण आठवलं. बाजारात दोन जण मोठमोठ्यानं भांडत होते. त्या भांडणात तिसरा आला. अंगापिंडानं थोराड, कपड्या लत्त्यावरुन प्रतिष्ठित मोठ्या करुड्या आवाजात म्हटला, ‘काय एकमेकाची शाळा घेताय’ ‘तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा’ या त्याच्या दोन्ही वाक्प्रचारांनी माझं लक्षच वेधून घेतलं. ‘शाळा घेणे’, ‘कार्यक्रम झाला’ म्हणणे हे वाक्प्रचार पारंपरिक व मूळारंभी निश्चितच नाहीत. हा कालगरजेचा परिपाक म्हणू या, की भाषिक परिवर्तनाची हाक, काही का असेना ही भाषिक अवकाश वृद्धी वा व्याप्ती म्हणून या वाक्प्रचारांकडे पाहताना मनोमन आनंदाची पेरणी बाकी निश्चित झाली.आणखी एका गोष्टीची नवलाई प्रस्तुत प्रसंगी सांगणेही मला अगत्याचे वाटते. प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात वावरताना विद्यार्थ्यांमध्ये ‘भासा’ हा शब्दप्रयोग एकमेकांना उद्देशून उच्चारला जाताना दिसून येतो. ‘भासा’ हा शब्द ‘भाचा’ या शब्दाचं बोलीरुप आहे. भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा. खरं म्हणजे या दोन्ही बोलणाऱ्यांमध्ये कुणीही बहिणीचा मुलगा नाही. एवढंच काय एकदा तर चक्क एका प्राध्यापक महोदयांनी ‘वो भासा इकडे ये’ अशी हाक एका विद्यार्थ्याला दिली. मला सांगा या बदलास काय म्हणावे. कोणते नाव द्यावे. माझा हा गुंता एका विद्वत मित्राजवळ बोलायला गेलो तर त्याने सर्वात आघाडी घेत यावर जणू कमान उभारली अन् म्हटला, हो न यार वाना ‘माझे तर इंडीकेटरच लागतात’ असं हे ऐकून माझा गुंता तर त्या विद्वत मित्राने सोडवलाच नाही. पण एक नवा वाक्प्रचार त्याने दिल्याचा मला मात्र मनापासून आनंद झाला.- प्रा.वा.ना.आंधळे, साहित्यिक, धरणगाव, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव