शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या कागदपत्रांच्या आधारे बळकावल्या जमिनी व प्लाॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

स्टार ८५५ जळगाव : बनावट व्यक्ती, आधारकार्ड, मतदान कार्ड व इतर खोटी कागदपत्रे सादर करून शेतजमिनी व प्लॉट बळकावल्याच्या ...

स्टार ८५५

जळगाव : बनावट व्यक्ती, आधारकार्ड, मतदान कार्ड व इतर खोटी कागदपत्रे सादर करून शेतजमिनी व प्लॉट बळकावल्याच्या अडीच वर्षात जिल्ह्यात १५ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या असून भादवि कलम ४२० अन्वये विश्वासघात, फसवणूक केली म्हणून संबंधित व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल केलेले आहेत. या सर्व गुन्ह्यांत संशयितांना अटक झालेली आहे. जिल्हा पेठच्या एका गुन्ह्यात एक बलाढ्य आरोपी अजूनही फरार आहे.

तालुक्यातील उमाळा, कंडारी या भागातील शेकडो एकर जमीन, जी अस्तित्वातच नाही, अशी काही लोकांना कमी दरात खरेदी करून दिल्याचा प्रकार पाच वर्षापूर्वी घडला होता. जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातून या जमिनी खरेदी करून देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे बनावट व्यक्ती उभ्या करून त्यांची बनावट कागदपत्रे सादर करून हा खरेदी-विक्रीचा प्रकार घडला होता. त्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही पोलिसांच्या रडारवर आले होते. यात शेकडो लोकांची फसवणूक होऊन त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील प्लॉट व घरांची बनावट व्यक्ती व बनावट कागदपत्रांच्या आधारावर परस्पर विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बाहेर जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तींच्या मालमत्ता हडप करण्यात आल्या होत्या. ही एक साखळीच होती. यात देखील अनेकांना अटक झाली होती. यात महिलेलाही अटक झालेली होती.

जिल्ह्यात लॅण्ड डिस्‌प्युट्‌स‌ सेल नाही

प्लॉट व जमिनी हडपल्याच्या तक्रारींसाठी मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात लॅण्ड डिस्‌प्युट्‌स‌ सेल कार्यरत असत. जळगाव जिल्ह्यात या सेलची निर्मितीच झालेली नाही. मुंबई, पुणे व नागपूरसारख्या मोठ्या महानगरांत हे प्रकार अधिक असल्याने तेथे हा सेल असतो, ग्रामीण क्षेत्रात अर्थात पोलीस अधीक्षक असलेल्या जिल्ह्यात हा सेल नाही. असे प्रकार घडले तरी थेट संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात.

तक्रारीनंतर खरेदी व नोंदी झाल्या रद्द

जळगाव शहरात बनावट कागदपत्रे व बनावट व्यक्ती दाखवून प्लॉट, घर व जमीन हडपण्याच्या तक्रारी झाल्यानंतर त्याचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आलेली असून या खरेदी व नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा पेठ व रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल झालेले आहे. शहर पोलीस ठाण्यातही असे गुन्हे दाखल झालेले आहेत.

अडीच वर्षात फसवणुकीचे २२७ गुन्हे

जळगाव जिल्ह्यात २०१९ ते मे २०२१ या कालावधीत फसवणूक अर्थात विश्वासघात केल्याचे २२७ गुन्हे दाखल झालेले आहेत. २०२९ मध्ये ६७, तर २०२० मध्ये ७१ व चालू वर्षात पाच महिन्यात ८९ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात प्लाॅट, जमीन बळकावल्याचे फक्त १५ गुन्हे आहेत. इतर गुन्हे हे नोकरीचे आमिष, वाहन खरेदी, लग्न करताना झालेली फसवणूक यांसह वेगवेगळ्या कारणांनी फसवणूक झाल्याचे आहेत. दरम्यान, काही प्रकरणे दिवाणी न्यायालयातही दाखल झालेली आहेत.

जमीन, प्लॉट बळकावल्याच्या तक्रारी

२०१९ : ०६

२०२० : ०७

२०२१ : ०२

कोट...

लॅण्ड डिस्‌प्युट्‌स‌ सेल आपल्या जिल्ह्यात नाही. फसवणुकीचे जे गुन्हे दाखल आहेत त्यातच प्लॉट, शेती, घर व जमीन बळकावल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यासाठी स्वतंत्र गुन्हे किंवा तशी यंत्रणा नाही. दाखल गुन्ह्यात आरोपी अटक करणे, न्यायालयात दोषारोपपत्र पाठविणे ही प्रक्रिया केली जाते. सद्यस्थितीत अशा गुन्ह्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाल्याचे गुन्हे अनेक आहेत.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक