शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुलचे उमर्टी कनेक्शन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 20:04 IST

रामेश्वर कॉलनीतील गोळीबार प्रकरण

ठळक मुद्दे संशयितास दोन दिवसाची पोलीस कोठडीआठवडाभरातील तिसरे पिस्तुलसंशयिताचे पोलिसांना असहकार्य

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१ : रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी भागात झालेल्या गोळीबारातील गावठी पिस्तुल हे सातपुड्याच्या सिमेतील उमर्टी येथून आल्याचा संशय असून ते कोणामार्फत विशाल अहिरेकडे आले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान, अहिरे याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विशाल अहिरे याने मंगळवारी दुपारी सागर भालेराव याला जेवणासाठी घरी बोलावले होते. त्यावेळी त्याने तोंडाला पिस्तुल लावून गोळीबार केल्याचा जबाब जखमी सागरने स्वत:च्या हस्ताक्षरात पोलिसांकडे लिहून दिला आहे. त्याने गोळी का मारली याचे कारण मात्र गुरुवारीही समोर आले नाही. अहिरे याच्या घरातून गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतूस जप्त करण्यात आले आहे.

उमर्टीत घरोघरी तयार होतात पिस्तुलसातपुड्याच्या पायथ्याशी असलेले उमर्टी हे जळगाव जिल्ह्याच्या सिमेलगत असले तरी ते  मध्यप्रदेशात येते. येथे आदीवासी घरोघरी हे पिस्तुल तयार करतात. सर्वात जास्त पिस्तुल हे जळगाव जिल्ह्यातच येत असल्याचे वारंवारच्या कारवायांवरुन सिध्द झाले आहे. अहिरे याच्याकडे असलेले हे पिस्तुल देखील उमर्टीचेच असल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र ते अहिरेने कोणाच्या माध्यमातून घेतले हे अद्यापही त्याने पोलिसांना सांगितलेले नाही. या दोन दिवसात या गोष्टीचाही उलगडा होईल,असा विश्वास पोलिसांना आहे.आठवडाभरातील तिसरे पिस्तुलया आठवडाभरात हे तिसरे पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. त्याआधी नेरीजवळ रस्ता लुटीच्या प्रकरणात सराईत गुन्हेगार भूषण उर्फ जिगर बोंडारे याच्याकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले तर दुसरे पिस्तुल त्याचा फरार साथीदार गणेश पाटील याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. याआधी देखील शनी पेठ, स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केले आहेत.संशयिताचे पोलिसांना असहकार्यया गुन्ह्यात अटकेत असलेल्या विशाल अहिरे व जखमी सागर भालेराव या दोघांविरुध्द आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे. सातत्याने दोन दिवस केलेल्या चौकशी अहिरेने पोलिसांना सहकार्य केलेले नाही. तपासाधिकारी समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी त्याला गुरुवारी न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.