शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई यात्रोत्सवात लाखो भाविक वारकऱ्यांनी फुलविला भक्तीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:08 IST

माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा जयघोषात टाळ मृदुंगाच्या निनादाने मुक्ताईनगर दुमदुमून गेले.

ठळक मुद्देराज्यातील विविध भागातून ३०० दिंड्या दाखलदिंड्याच्या फडावरील चैतन्य मनोहारीदर्शन बारीत दरवर्षीपेक्षा या वेळेस मोठ्या प्रमाणावर गर्दीमानाच्या वारकऱ्यांचा झाला सन्मान

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा जयघोषात टाळ मृदुंगाच्या निनादाने मुक्ताईनगर दुमदुमून गेले. शेकडो मैल पायी चालत संत दर्शनाची ओठ घेऊन आलेल्या वारकऱ्यांचा मुक्ताई दर्शनानंतर भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद याची देही याची डोळा साठवावा असा होताएकादशी पर्वा काळावर भाविकांनी मुक्ताई पायथ्याशी व तापी पूर्णा संगमावर स्नान केले. पहाटे चार वाजता आदिशक्ती मुक्ताईचे मानकरी व अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी संत मुक्ताबाई महाअभिषेक केला. पाच वाजता खासदार रक्षा खडसे व मानाचे वारकरी मधुकर रघुनाथ नारखेडे निमखेड, जि.बुलढाणा यांनी मुक्ताई अभिषेक व आरती केली. यावेळी महानंदा दूध फेडरेशन चेअरमन मंदा खडसे, कोथळी पोलीस पाटील संजय चौधरी, व्यवस्थापक उद्धव जुनारे, प्रा. निन झोपे, पुजारी विनायक व्यवहारे महाराज उपस्थित होते.संत मुक्ताई नवीन मंदिरात पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. पौराहित्य रवींद्र महाराज हरणे यांनी केले.दरम्यान, पहाटे पाचपासून भाविकांनी मुक्ताई पायथ्याशी जलाशयात श्रद्धेची डुबकी लावून भाविकांनी मंदिराकडे मुक्ताई दर्शनासाठी धावा केला. हजारो भाविक दर्शनबारीत रांगा लावून उभे होते तर कालपासून येथे दाखल झालेल्या शेकडो पायी दिंड्या व मुक्कामी आलेल्या वारकºयांची संत मुक्ताई दर्शनाची ओढ स्फूर्ती देणारी चैतन्यदायी होती. दोन्ही ठिकाणच्या मंदिर परिसरात भाविकांचा मुक्ताई दर्शनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवे मुक्ताई मंदिरा च्या प्रशस्त सभामंडपा बाहेर दिंड्यांना देण्यात येणाºया निर्धारीत वेळेत वारकरी भजन कीर्तन जयघोषाने परिसर दणाणला होता. अगदी भारुड, फुगडी करून वारकरी संत भक्तीत बेभान व तल्लीन झाल्याचे चित्र उमटून येत होते. पायी दिंडीच्या नगरप्रदक्षिणाने मुक्ताईनगरचे मुख्य रस्ते वारकºयांनी फुलले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाचा जयघोष टाळमृदंगाचा गजर शिस्तीने श्रद्धेने व भक्ती भावाने तल्लीन झालेल्या वारकºयांनी शहरभर आध्यात्मिक आनंदाची उधळण केली आणि शहर भक्तीरसात चिंब झाले.यंदाच्या यात्रोत्सवात तिनशेवर दिंड्यांनी श्री क्षेत्र मुक्ताईनगर व कोथळी स्थित नवीन व जुन्या मंदिरात हजेरी लावल्याने संपूर्ण मुक्ताईनगरी दुमदुमल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला व भक्तिमय वातावरण सर्वत्र पसरले.महाराष्ट्रातील कानाकोपºयासह मध्य प्रदेशातील खंडवा तसेच बºहाणपूर जिल्ह्यातील पायी दिंड्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. नवीन मुक्ताई मंदिरावरच जवळपास १५० दिंड्यांचे फड पडले असून, भजन व कीर्तन सोहळे सुरू आहेत.दर्शन बारी- दरवर्षीपेक्षा या वेळेस मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून येत ३०० दिंड्यांसह दोन लाख भाविकांनी मुक्ताईचे दर्शन घेतले. दर्शन लांबलचक लागली होती. दर्शन बारीचे नियोजन कौतुकास्पद होते. दर्शनबारीमध्ये पाण्याची व्यवस्था मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीने केली आहे.पुस्तक विक्री- यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर धर्म व वारकरी ग्रंथ, सााहित्य विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. यात हरिपाठ, तुकाराम गाथा, भागवत यासह वारकरी साहित्य भाविक खरेदी करत होते. तुळशीमाळा, गोपीचंदन व कुमकुम याची दुकाने थेट पंढरपूर येथून आले होते,भांड्याची दुकाने- यात्रोत्सवात भांड्याची दुकाने एक आकर्षणाचा विषय आहे. खान्देशाचा यात्रोत्सवात या बाजाराचा दुसरा क्रमांक लागतो.ग्रामीण भागातील पंचायत, मंडळ व खासगी वापराची घरगुती भांडे लोक मोठ्या प्रमाणात या यात्रेतून खरेदी करतात.या यात्रोत्सवात घरघुती लहान भांड्यापासून, कढई, चमचे सरोटा, तांबा व पितळाची भांड,े समई दिवे येथे मिळतातदिंड्याच्या फडावरील चैतन्य-शेकडो मैल मुक्ताई भेटीचा ओढीने पायी चालत येणाºया वारकºयांना मुक्ताई भेटीचा आनंद खूप मोठा असतो. दशमीला पोहचलेल्या दिंड्या नगरप्रदिक्षणा घातल्यानंतर मुक्ताई दरबारी दाखल होतात. दर्शन घेतल्यावर आपल्या मुक्कामाचा फडावर पोहचतात. रात्री उशिरापर्यत कीर्तन, भजन, हरिनामाचा गजर सुरु असतो. फडावरील टाळ मृंदगाचा गजरात सुरु असलेली पावली असो कि थकवा दुर करणारी भारुडे असो या मध्ये वारकरी तल्लीन होतात. वारकºयांच्या चेहºयावर भक्तीचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र असते.ठिकठिकाणी फराळ वाटप-नवीन मंदिरात आजच्या फराळाची व्यवस्था मुरलीधर गंगाराम पाटील रा.केºहाळा यांनी केली होती. मुक्ताई मंदिर परिसरात खडसे परिवाराकडून फराळ वाटप करण्यात आले. विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांतर्फे फराळ वाटप करण्यात आले. यासह अनेक मंडळातर्फे ठिकठिकाणी पालख्या व वारकºयांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले, तर शहरात अनेक मान्यवरांनी परंपरेने त्यांच्याकडे येणाºया दिंड्यांचे स्वागत करून फराळ वाटप केले.सुरक्षा- मुक्ताई मंदिर परिसरात भाविकांना सेवा देण्यासाठी ६० स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. त्यात ३० महिला कर्मचारी आहेत. पोलीस बदोबस्त चोख आहे.बस सेवा- मुक्ताई यात्रोत्सवानिमित्त मुक्ताई मंदिर, चांगदेव मंदिर तसेच परिसरात जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.महाशिवरात्री दिनी ४ रोजी आदिशक्ती संत मुक्ताबाई आपल्या लाडक्या शिष्य योगी चांगदेव भेटीसाठी वारकरी दिंड्यांसह चांगदेव गावी जातील.मानाचे वारकरी सत्कारसंत मुक्ताबाई पूजा आरतीचा मान यावर्षी सुशीला व मधुकर रघुनाथ नारखेडे रा. निमखेड, जि.बुलढाणा या वारकरी दांपत्याला मिळाला. त्यांचा सन्मान संस्थान अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व खासदार रक्षा खडसे यांनी महावस्त्र, मुक्ताबाई प्रतिमा व ग्रंथ देवून केला.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेMuktainagarमुक्ताईनगर