शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

भगिनींनो, सक्षम होऊ या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:44 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांच्या संदर्भात चाळीसगाव येथील वकील तथा साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी घेतलेला आढावा.

काही कटू, तर काही सुखद घटनांचा लेखाजोखा देत २०१९ हे वर्ष पाठमोरं होत आहे. ‘निरोप मावळत्याला, स्वागत उगवत्याचे’ या न्यायाने आपण नववर्षाच्या स्वागताला सज्ज झालो आहोत. प्रत्येक सरणारी घटिका ही तथाकथित सुखद, दु:खद किंवा संमिश्र भावनांचे पडसाद आणि काही आव्हानांची नांदी मागे ठेवून जात असते. त्या अनुषंगाने प्रत्येकानेच स्वत:ला अधिक सक्षम आणि प्रबळ बनविण्याची गरज असते.महिलांच्या दृष्टिकोनातून २०१९ ह्या कालखंडाचा मागोवा घेताना काही घटना ह्या निश्चितच समस्त महिलावर्गाच्या मनोबलाचं खच्चीकरण करणाऱ्या घडल्या आहेत.जी भारतीय स्त्री लोकसंख्येचा ५० टक्के भाग व्यापून आहे, अर्ध आकाश जिचं आहे आणि जी स्त्री सर्वच क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेण्यास सर्वार्थाने सज्ज आहे तीच स्त्री जेव्हा सामूहिक झुंडशाही, पाशवी बलात्कार आणि हत्या, अ‍ॅसिड हल्ले, आॅनर किलिंग, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी यासारख्या घटनांना बळी पडते तेव्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ज्वलंत सामाजिक प्रश्न बनून ऐरणीवर येतो. व्यक्ती म्हणून निकोपपणे जगणही हिरावून घेत मानवतेला काळिमा फासणाºया अलिकडल्या काळातील उन्नाव व हैदराबादच्या पाशवी बलात्कार व हत्येच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून टाकला आहे.हा क्षोभ, ही वेदना क्षणिक ठरू नये. समष्टीचं जगणं आणि भोगणं जेव्हा सर्वव्यापी होईल तेव्हाच अत्याचार पीडिता ही कुणा दुसºयाची मुलगी ही भावनाच संपून जाईल. त्या दुखाची तीव्रता ही समस्त स्त्री वर्गाची व्याप्ती होईल. आणी स्त्री वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने संघटित होऊन लढा उभारेल तेव्हाच कायद्याला ढील देणाºया सरकारलादेखील पळता भुई थोडी होईल. २०१२ मधे घडलेल्या दिल्लीतील निर्भया बलात्कार पीडितेला अजून न्याय मिळालेला नाही. आरोप सिद्ध होऊनही सात वर्षांनंतरही आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही हे समाजस्वास्थाला हितकारक नाही. असे असताना कठोर कायद्याचा अभाव व न्यायप्रकियेला विलंब ही कारणं खचितच समर्थनिय नाहीत. आपल्याला लोकशाहीने जनआंदोलन, मोर्चे ही प्रभावी आयुधं दिलेली आहेत. जनक्षोभाचा परिपाक आपण हैदराबादमध्ये बघितला आहे. आंध्र सरकारने बलात्कारप्रकरणी पंधरा दिवसात न्यायालयीन निवाडा व्हावा, हा कायदा संमत केला आहे. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या दिशेने पाऊल उचलण्यासाठी सकारात्मक आहेत. राजकीय इच्छाशक्ती दबाव तंत्रापुढे झुकते हे सत्य आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला पाहिजे. म्हणून महिलांनी संघटित होऊन प्रबळ असा दबाव गट निर्माण करून समर्थपणे चळवळी उभारणे ही काळाची गरज आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो धजेल तयाचे’ हा बोधमंत्र घेऊन अधिक आत्मनिर्भय होऊया. नववर्षात अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी मजबूतपणे संघटित होऊ या.-अ‍ॅड.सुषमा जयंत पाटील, चाळीसगाव, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव