शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्यासाठी भाजपाला घ्यावे लागणार परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:03 IST

तालुका वार्तापत्र : साक्री

ठळक मुद्देचुरस : काँग्रेसचे पाडवी यांना पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन करावे लागेल प्रचार

साक्री : नंदुरबार मतदार संघ हा काँग्रेससाठी शुभशकुन ठरला होता. परंतु काँग्रेसच्या अभेद्य तटबंदीला सुरुंग लावण्याचे काम डॉ. हीना गावित यांनी केले. मात्र यंदा त्यांना साक्री तालुक्यात मताधिक्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे मानले जात आहे.पुनर्रचनेनंतर साक्री तालुका नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. साक्री तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व आहे. धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी मतदारसंघ बांधून ठेवला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी मोदी लाट होती. या लाटेत साक्रीतून भाजपाला केवळ १ हजार ७४७ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. हीना गावित यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. नाराज शिवसेना त्यांना मनापासून किती सहकार्य करेल याविषयी शंका आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाप्रसंगीच्या प्रकरणामुळे मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे.धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे हे साक्री तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तालुक्यात शिक्षणसंस्थाही आहेत. त्यांच्या जनसंपर्काचा फायदा डॉ.गावित यांना होईल.दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे अ‍ॅड. के.सी. पाडवी रिंगणात आहेत. त्यांचा साक्री तालुक्योशी फारसा जवळचा संबंध नाही, परंतु काँग्रेस पक्षाचे नेटवर्क त्यांच्या कामी येऊ शकते. भरत गावीत यांना तिकिट नाकारल्याने त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्याचे काम अ‍ॅड.पाडवींना करावे लागणार आहे.साक्री नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्वतालुक्यातील साक्री नगरपंचायतीवर काँग्रेसने ग्रामपंचायतीपासूनचे आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. नगरपंचायतीत काँग्रेसने १६ पैकी ११ जागा मिळविल्या. तर आघाडीतील राष्टÑवादीने ४ जागा मिळविल्या आहे.एक अपक्ष निवडून आला आहे. नगरपंचायतीत भाजपला खातेही उघडता आलेले नाही.

टॅग्स :Politicsराजकारण